पिंपरी (दि. २५ एप्रिल २०२६) – आंतरराष्ट्रीय कामगार दिन, महाराष्ट्र राज्य स्थापनादिन आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने ३४ वी श्रम-उद्योग परिषद तसेच उपेक्षित कष्टकऱ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, दि. ३० एप्रिल २०२६ रोजी दुपारी ३.३० वाजता ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, चिंचवड येथे होणार (Narayan Surve) आहे.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित असतील. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार असून, टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे हे स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार (Narayan Surve)आहेत.
कार्यक्रमात उद्योजक भगवान पठारे यांना पद्मश्री नारायण सुर्वे कृषी-उद्योग जीवनगौरव सन्मान, नीता सातपुते यांना कृष्णाबाई नारायण सुर्वे मास्तरांची सावली सन्मान, प्राचार्य शंकर देवरे यांना पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस सन्मान, कामगार साहित्यिक अरुण गराडे यांना पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान, कवयित्री संगीता झिंजुरके यांना पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार तसेच डॉ. स्वाती पाटील आणि नीलेश शेंबेकर यांना पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार (Narayan Surve) आहेत.
याशिवाय समाजातील उपेक्षित कष्टकरी म्हणून मितेश डूळगज (शवविच्छेदक मजूर), प्रशांत बराटे (स्मशानभूमी सेवक), मुरलीधर फुंदे (सुरक्षारक्षक), कल्पना कदम (मोलकरीण), मनोजकुमार राम (पीठगिरणी मजूर) आणि प्रवीण बागूल (सफाई मजूर) यांचा विशेष सत्कार करण्यात येणार (Narayan Surve) आहे.
या प्रेरणादायी सोहळ्यास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजन समितीचे सचिव पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले (Narayan Surve) आहे.
