Home माझं पिंपरी चिंचवड RCB vs GT : विराटचा झंझावात, गुजरातवर आरसीबीचा ५ विकेट्सने धुव्वा

RCB vs GT : विराटचा झंझावात, गुजरातवर आरसीबीचा ५ विकेट्सने धुव्वा

विराट कोहलीच्या ८१ धावांच्या दमदार खेळीच्या जोरावर आरसीबीचा गुजरात टायटन्सवर शानदार विजय; प्लेऑफच्या आशा बळकट.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगलेल्या धडाकेबाज सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सवर ५ विकेट्सने शानदार विजय मिळवला. २०६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीने आरसीबीला संस्मरणीय विजय मिळवून (RCB vs GT) दिला.

प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत ३ बाद २०५ धावांचा भक्कम डोंगर उभारला. साई सुदर्शनने अप्रतिम शतक झळकावत संघाला मजबूत स्थितीत नेले, तर शुभमन गिलनेही उपयुक्त साथ दिली. मोठा स्कोअर उभारल्यानंतर गुजरातचे पारडे जड मानले जात (RCB vs GT) होते.

मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीने अनुभव आणि आक्रमकतेचा सुरेख मिलाफ दाखवला. त्याने ४४ चेंडूत ८१ धावांची खेळी साकारत गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. देवदत्त पडिक्कलने ५५ धावांची झंझावाती साथ देत दुसऱ्या विकेटसाठी मोठी भागीदारी रचली आणि सामना पूर्णपणे आरसीबीच्या बाजूने (RCB vs GT)झुकवला.

शेवटच्या षटकांत कृणाल पंड्या आणि टिम डेव्हिड यांनी संयमी फलंदाजी करत संघाला १८.५ षटकांत लक्ष्य गाठून दिले. या विजयासह आरसीबीने गुणतालिकेत दमदार झेप घेत प्लेऑफच्या आशा अधिक बळकट (RCB vs GT) केल्या.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00