Home प्रेरणा / यशकथा Virat Hindu Sammelan :चिखलीत प्रथमच भव्य ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न

Virat Hindu Sammelan :चिखलीत प्रथमच भव्य ‘विराट हिंदू संमेलन’ उत्साहात संपन्न

चिखलीतील नेवाळे वस्ती येथे प्रथमच आयोजित विराट हिंदू संमेलन उत्साहात पार पडले. कालिचरण महाराज व अविनाश भेगडे यांनी समाजएकता, संस्कार आणि देशकार्यासाठी संघटित होण्याचे आवाहन केले.

by Admin
Spread the love

चिखली (प्रतिनिधी) दि. २० एप्रिल २०२६ : नेवाळे वस्तीतील धर्मरक्षक भुजबळ प्रांगण येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेले भव्य ‘विराट हिंदू संमेलन’ मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला चिखली व पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट, हरिपाठ-भजनी मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ तसेच हजारो नागरिकांची उपस्थिती (Virat Hindu Sammelan) लाभली.

 

संमेलनात प्रमुख वक्ते कालीपुत्र कालिचरण महाराज यांनी हिंदू समाजाने संघटित राहून धर्मरक्षणासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. हिंदू धर्म हा अध्यात्म, संस्कार आणि शौर्याची परंपरा असल्याचे सांगत समाजातील एकता व स्वाभिमान जपण्याची गरज त्यांनी व्यक्त (Virat Hindu Sammelan)  केली.

 

सामाजिक कार्यकर्ते अविनाश भेगडे यांनी देशहितासाठी प्रत्येकाने स्वार्थ बाजूला ठेवून समाजकार्यासाठी वेळ देण्याचे आवाहन केले. कुटुंबव्यवस्था मजबूत ठेवणे, पर्यावरण संवर्धन, स्वदेशी वस्तूंचा वापर आणि सामाजिक ऐक्य यावर त्यांनी भर (Virat Hindu Sammelan)दिला.

 

कार्यक्रमाचे संयोजक दत्तात्रय ढोले पाटील यांनी संमेलनाची प्रस्तावना करताना हा कार्यक्रम हिंदू समाजाच्या एकतेचा आणि अस्मितेचा जागर असल्याचे(Virat Hindu Sammelan) सांगितले.

 

कार्यक्रमाची सुरुवात ढोल-ताशांच्या गजरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीच्या मिरवणुकीने झाली. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन, पारंपरिक युद्धकला सादरीकरण, गोमाता आरती आणि सामूहिक भोजनाने कार्यक्रमाचा समारोप झाला. सूत्रसंचालन राजाराम सावंत यांनी तर आभार प्रदर्शन अनुपमाताई पाटील यांनी(Virat Hindu Sammelan) केले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00