Home गुन्हे Morph Photo Case:मॉर्फ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५ लाखांची खंडणी; रावेत पोलिसांकडून आरोपी अटकेत

Morph Photo Case:मॉर्फ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५ लाखांची खंडणी; रावेत पोलिसांकडून आरोपी अटकेत

रावेत पोलिसांनी मॉर्फ केलेले अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत ५ लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपीला अटक केली. ऑनलाइन ब्लॅकमेलिंगच्या या धक्कादायक प्रकारामुळे खळबळ उडाली आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी चिंचवड(प्रतिनिधी ): होणाऱ्या पत्नीचे आणि आईचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल ५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रावेत पोलिसांनी ऋषिकेश भाऊसाहेब शिंदे (रा. हिंजवडी फेज-३, ता. मुळशी, जि. पुणे) याला अटक केली (Morph Photo Case)आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार १६ एप्रिल २०२६ ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत ऑनलाइन माध्यमातून घडला. आरोपीने वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांचा वापर करून फिर्यादीशी संपर्क साधला. त्यानंतर फिर्यादीच्या होणाऱ्या पत्नीचे आणि आईचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत ५ लाख रुपयांची मागणी (Morph Photo Case) केली.

 

याशिवाय, काही अश्लील वेबसाइट्सवर फोटो अपलोड केल्याचे सांगून ते हटवण्यासाठी पैसे द्यावे लागतील, असा दबावही आरोपीने टाकला. या धमक्यांमुळे घाबरलेल्या फिर्यादीने रावेत पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल (Morph Photo Case)केली.

 

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पुढील तपास सुरू असून या प्रकरणामागील इतर बाबींची चौकशी करण्यात येत (Morph Photo Case) आहे.

 

दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या ऑनलाइन ब्लॅकमेलिंगच्या घटनांपासून सावध राहावे. कोणत्याही प्रकारची धमकी, खंडणीची मागणी किंवा सोशल मीडियावर बदनामीची भीती दाखवली जात असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क(Morph Photo Case) साधावा.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00