Home राजकारण Nominated Corporators:पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकृत सदस्यपदावरून राजकीय हालचालींना वेग; आज निर्णयाची शक्यता

Nominated Corporators:पिंपरी-चिंचवड महापालिकेत स्वीकृत सदस्यपदावरून राजकीय हालचालींना वेग; आज निर्णयाची शक्यता

महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक नियुक्तीवरून राजकीय हालचालींना वेग. भाजप व राष्ट्रवादीत चर्चांना उधाण, आज सर्वसाधारण सभेत निर्णयाची शक्यता.

by Admin
Spread the love

 (प्रतिनिधी ), दि. २० — पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीप्रश्नी राजकीय घडामोडींना वेग आला असून आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ताधारी भाजपकडून सात जागांसाठी अंतिम नावे जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात (Nominated Corporators) आहे.

 

यापूर्वी स्वीकृत सदस्यपदाबाबत निर्णय अपेक्षित होता. मात्र विविध राजकीय समीकरणे आणि पक्षांतर्गत चर्चांमुळे प्रक्रिया लांबली होती. आता एप्रिल महिन्यात हा निर्णय मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. सभेत नावे सादर झाल्यानंतर त्यांना मान्यता देण्याची औपचारिकता पूर्ण केली जाणार  (Nominated Corporators )आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीन जागांसाठी दावे करण्यात आले असून त्यावरून मागील काही आठवड्यांपासून जोरदार हालचाली सुरू होत्या. पक्षांतर्गत समन्वय साधण्यासाठी अनेक बैठकांचे आयोजन करण्यात आले. अखेर वरिष्ठ पातळीवर चर्चा पूर्ण झाल्यानंतर नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता (Nominated Corporators )आहे.

 

दरम्यान, भाजपमध्येही इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतिम यादी ठरविताना पक्षश्रेष्ठींना तारेवरची कसरत करावी लागली. शहरातील विविध प्रभाग, सामाजिक समतोल, पक्षनिष्ठा आणि आगामी निवडणुका लक्षात घेऊन नावे निश्चित केली जात असल्याचे सांगितले (Nominated Corporators )जाते.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सध्या भाजपचे बहुमत असून इतर पक्षांनाही प्रतिनिधित्व आहे. स्वीकृत सदस्यपदाच्या नियुक्तीनंतर महापालिकेतील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होणार असल्याने या निर्णयाला विशेष महत्त्व प्राप्त झाले (Nominated Corporators )आहे.

 

आजच्या सभेनंतर स्वीकृत सदस्यांची अधिकृत घोषणा होताच शहराच्या राजकारणाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात (Nominated Corporators )आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00