पिंपरी, (प्रतिनिधी) : “2007 पासूनचा माझा राजकीय प्रवास कार्यकर्त्यांच्या खांद्यावर उभा आहे. संघर्षाच्या प्रत्येक क्षणी कार्यकर्त्यांनी दिलेल्या पाठबळामुळेच आज ही उंची गाठता आली.” अशा शब्दांत पिंपरी-चिंचवड निवडणूक प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी कृतज्ञता व्यक्त (Shankar Jagtap100 Par) केली.
थेरगाव, कामगार भावना येथे आमदारपदाची वर्षपूर्ती आणि निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती निमित्त भव्य कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यातील उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून “आगामी महापालिका निवडणुकीत अब की बार 100 पार हा नारा आपण नक्की पूर्ण करू” असा निर्धार जगताप यांनी (Shankar Jagtap100 Par) व्यक्त केला.
याच व्यासपीठावर पुढील वर्षी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांच्या वर्षपूर्तीचा सोहळा याच ठिकाणी साजरा करू असा संकल्पही (Shankar Jagtap100 Par) त्यांनी जाहीर केला.
मेळाव्याला विधान परिषद सदस्या उमा खापरे, अमित गोरखे, भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, माजी खासदार अमर साबळे, माजी महापौर माई ढोरे, विविध पदाधिकारी, नगरसेवक आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या मेळाव्यात भाजपाचे (Shankar Jagtap100 Par) भव्य शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले.
“कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळेच प्रवास शक्य” – जगताप
शंकर जगताप म्हणाले,
“1992 पासून दिवंगत लोकनेते लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांसोबत राहून राजकारणाचे धडे गिरवले. लक्ष्मणभाऊ नेहमी म्हणायचे – ‘भाऊ कार्यकर्त्यांसारखे काम करतात आणि कार्यकर्ते मला भावासारखे आहेत.’ हे माझ्या (Shankar Jagtap100 Par)मनात कायम कोरले आहे.”
ते पुढे म्हणालेः
“भाजपा हा एकमेव पक्ष आहे जो गुण, कष्ट आणि प्रामाणिकतेला योग्य स्थान देतो. उमा खापरे आणि अमित गोरखे यांची आमदार म्हणून झालेली निवड याचेच उदाहरण आहे. चिंचवडमध्ये देवदुर्लभ कार्यकर्ते असल्यामुळे 100 जागा मिळवणे (Shankar Jagtap100 Par) अशक्य नाही.”
पाणी व्यवस्थापन आणि नदीसुधार प्रकल्पांवर ‘फोकस’
आमदार म्हणून केलेल्या कामांचा आढावा घेताना जगताप म्हणाले :
-
नागपूर हिवाळी अधिवेशनात निळी पूररेषा, अनधिकृत बांधकामे, ग्राहक सुविधा, वीजपुरवठा, सांगवी उपविभाग पुनर्रचना अशा अनेक प्रश्नांसाठी सरकारला सतत धडक दिली.
-
‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमातून 13 प्रभागांमधील 5 हजारांहून अधिक तक्रारी निकाली काढल्या.
-
हिंजवडी आयटी पार्क, पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवरील अपघात आणि वाहतूककोंडीबाबत ठोस पावले उचलली.
-
वाकड–ताथवडे–रावेत राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करून सेवा रस्ते विस्तारीकरणाच्या निविदा मंजूर करून घेतल्या.
-
भक्ती शक्ती ते रावेत–वाकड–भोसरी–मोशी–चाकण मेट्रो मार्गाचा डीपीआर शासनाकडे सादर केला.
-
2051 लोकसंख्या लक्षात घेऊन मुळशी धरणातून 760 एमएलडी अतिरिक्त पाणी साठा मिळवण्यासाठी पाठपुरावा.
-
पवना, मुळा, इंद्रायणी नदी संवर्धनासाठी नदीसुधार प्रकल्प राबवण्यास गती.
“या प्रकल्पांमुळे चिंचवडचा चेहरामोहरा बदलणार आहे,” असा विश्वासही (Shankar Jagtap100 Par) त्यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांच्या संघटित बळावर निवडणूक यशस्वी करू
जगताप पुढे म्हणाले :
“भाजपाने पडद्यामागे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देऊन माझ्यावर विश्वास दाखवला. शहराध्यक्ष म्हणून 1 लाख 61 हजार सदस्य नोंदणी हा जिल्ह्यातील विक्रम होता. आता महापालिका निवडणुकीसाठी संघटन मजबूत करून भव्य विजय मिळवायचा आहे.”
याच मंचावर पुढील वर्षी महापौर, स्थायी समिती अध्यक्षांच्या वर्षपूर्ती सोहळ्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी (Shankar Jagtap100 Par)केला.
