Home पर्यटन Shankar Jagtap MLA initiatives:पिंपरी चिंचवड: हिंजवडी आयटी पार्क वाहतूक कोंडीसाठी सेवा रस्ते विकासाला वेग – आमदार शंकर जगताप

Shankar Jagtap MLA initiatives:पिंपरी चिंचवड: हिंजवडी आयटी पार्क वाहतूक कोंडीसाठी सेवा रस्ते विकासाला वेग – आमदार शंकर जगताप

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी वाकड, ताथवडे, पुनावळे ते रावेतपर्यंत सेवा रस्त्यांचे डांबरीकरण जलद गतीने सुरू. आमदार शंकर जगताप यांच्या पाठपुराव्याने 321 कोटींच्या प्रकल्पाला केंद्रीय मंजुरी; आयटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकाराने रस्ते विकासाची कामे मोठ्या वेगाने सुरू झाली आहेत. पिंपरी चिंचवड शहरातून जाणाऱ्या मुंबई–बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाकड, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, रावेत आणि किवळे परिसरातील महत्त्वाच्या सेवा रस्त्यांच्या कामांसाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या स्तरावर पाठपुरावा करण्यात आला होता. या पाठपुराव्याला यश मिळत 321 कोटींच्या सेवा रस्त्यांच्या कामाला केंद्रीय मंजुरी मिळाली (Shankar Jagtap MLA initiatives )आहे.

या मंजुरीनंतर आमदार शंकर जगताप यांनी प्रलंबित कामांना गती देत सेवा रस्त्यांचे डांबरीकरण युद्धपातळीवर सुरू केले आहे. पुनावळे आणि ताथवडे परिसरातील डांबरीकरण पूर्ण झाले असून काम थेट भुमकर चौकापर्यंत पोहोचले आहे. आमदार स्वतः नियमितपणे कामांची पाहणी करत आहेत. या सुसज्ज सेवा रस्त्यांमुळे आयटी कर्मचाऱ्यांना तसेच स्थानिक नागरिकांना वाहतूक कोंडीपासून मोठा दिलासा मिळणार असल्याचा विश्वास त्यांनी  (Shankar Jagtap MLA initiatives )व्यक्त केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका सीमेत असलेल्या या सेवा रस्त्यांची जबाबदारी मॉर्थ, राज्य शासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत असल्याने महापालिकेला थेट काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून तसेच एनएचएआयच्या प्रकल्प संचालक संजय कदम, तांत्रिक व्यवस्थापक अंकित यादव, कार्यकारी अभियंता सुभाष घंटे आणि समन्वयक विनोद पाटील यांच्यासोबत सातत्याने समन्वय ठेवून हे काम मार्गी लावण्यात आले (Shankar Jagtap MLA initiatives )आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वरील सेवा रस्त्यांचे डांबरीकरण जलद गतीने सुरू आहे. पवना नदी ते पुनावळे अंडरपास आणि तेथून ताथवडे अंडरपासपर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्यात हे काम भूमकर चौकापर्यंत पूर्ण  (Shankar Jagtap MLA initiatives)होणार आहे.

हिंजवडी आयटी पार्ककडे ये-जा करणाऱ्या हजारो आयटी कर्मचाऱ्यांसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. पुनावळे, ताथवडे, वाकड, रावेत आणि किवळे या परिसरातून अंदाजे 9.7 किमीचा सेवा रस्ता विकसित होत असून त्याचबरोबर महापालिकेच्या हद्दीतील 12 मीटर रुंद डीपी रस्त्याचे कामही एनएचएआयने हाती घेतले आहे. वाढत्या रहदारीचा ताण कमी करण्यासाठी या दोन्ही कामांना वेग देण्यात आला (Shankar Jagtap MLA initiatives )आहे.

ताथवडे, पुनावळे, रावेत आणि वाकड परिसर झपाट्याने विकसित होत असून आयटी कंपन्या आणि मोठ्या निवासी प्रकल्पांमुळे येथे लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे या भागातील सबवे, सर्व्हिस रोड आणि महामार्गावरील वाहतूक व्यवस्था सुसज्ज करणे (Shankar Jagtap MLA initiatives )अत्यावश्यक झाले होते.

या सर्व कामांसाठी पुढील 50 वर्षांचा विचार करून नियोजन करण्यात आल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. वाहतूक कोंडीमुक्त, सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी उपाययोजना अंतिम टप्प्यात (Shankar Jagtap MLA initiatives ) आहेत.

ताथवडे, पुनावळे, रावेत, वाकड परिसराची देखील झपाट्‌याने वाढ झाली आहे.  या परिसरात अनेक आयटी कंपन्या व मोठ्या रहिवासी सोसायटी आहेत. त्यातच हा परिसर हिंजवडी आयटी पार्कला लागून असल्याने नागरिक या परिसरात वास्तव्यास पसंती देत आहेत. येथे नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना   पुनावळे, ताथवडे, वाकड येथील सब वे, मुंबई बेंगलोर हायवे, लगत असणारा सर्व्हिस रस्ता सुसज्ज आणि वेगवान करून देण्यासाठी प्राधान्याने काम केले जात आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करत या कामांना मार्गी लावले आहे.  परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी उपाययोजना अंतिम टप्प्यात आहेत. पुढील 50 वर्षाचे “व्हिजन” या कामांसाठी देण्यात आले आहे.
– शंकर जगताप : आमदार, पिंपरी चिंचवड भाजप.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00