प्रतिनिधी :जगातील तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता म्हणून भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत आहे. सन २०४७ मध्ये देशाचा १०० वा स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना भारत “विकसित राष्ट्र” म्हणून जगभर ओळखला जावा, यासाठी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सातत्याने कार्यरत आहे. वेगाने विकसित होत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य अग्रस्थानी आहे. या विकास प्रक्रियेत पिंपरी-चिंचवड शहराचेही महत्त्वपूर्ण योगदान (BJP Victory )आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते केंद्र सरकारपर्यंत एकाच विचारसरणीचे सरकार असल्यास शहराचा व राज्याचा नियोजनबद्ध आणि वेगवान विकास साधता येतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, सभापती राम शिंदे, मंत्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, पंकजाताई मुंडे, आमदार महेशदादा लांडगे, शंकर जगताप, उमाताई खापरे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले आदी मान्यवरांनी निवडणूक काळात शहरात प्रभावी प्रचार सभा(BJP Victory ) घेतल्या.
त्यामुळे १५ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मतदारांनी भारतीय जनता पार्टीला एकहाती सत्ता देत आपला ठाम विश्वास व्यक्त केला आहे. या विश्वासास पात्र ठरत पिंपरी-चिंचवड शहर देशात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी सर्व आमदार, खासदार, नगरसेवक, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने काम केले जाईल, अशी ग्वाही भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी (BJP Victory )दिली.
रविवारी (दि. १८) पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार महेशदादा लांडगे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, प्राधिकरणचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, दक्षिण भारत आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, शहर प्रवक्ता कुणाल लांडगे, शहर सरचिटणीस ॲड. मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाड्ड्ये, ज्येष्ठ नगरसेवक शितल ऊर्फ विजय शिंदे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, सुजाता पालांडे आदी उपस्थित(BJP Victory ) होते.
पत्रकारांशी संवाद साधताना शत्रुघ्न काटे म्हणाले की, २००७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तत्कालीन शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, आमदार महेशदादा लांडगे, माजी खासदार अमर साबळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरिकांनी भाजपाला मनपेत बहुमत दिले होते. त्यानंतर झालेल्या भरीव विकासकामांमुळे नागरिकांनी पुन्हा एकदा भाजपावर विश्वास व्यक्त केला(BJP Victory ) आहे.
आगामी काळात मेट्रोचे विस्तारीकरण, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, नियमित पाणीपुरवठा, नदी सुधार प्रकल्प, आरोग्य व वैद्यकीय सुविधा, शिक्षण, कला, क्रीडा, महिला सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था तसेच पर्यावरण संरक्षण या सर्व क्षेत्रांत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका देशात आदर्श ठरावी यासाठी नियोजनबद्ध विकास केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट (BJP Victory )केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच सर्व आमदार व खासदारांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता यावी यासाठी अमूल्य मार्गदर्शन केले. आमदार महेशदादा लांडगे, आमदार शंकर शेठ जगताप, आमदार उमाताई खापरे, आमदार अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, प्रदेश कमिटीचे पदाधिकारी, कोअर कमिटी सदस्य, माजी नगरसेवक, विविध आघाडींचे अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, बूथ प्रमुख व स्वयंसेवक यांनी एकत्रितपणे मेहनत घेतली. त्याचेच फलित म्हणून मतदारांनी भाजपावर विश्वास व्यक्त केला असून, हा विश्वास निश्चितच सार्थ ठरवू, असा विश्वास शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त (BJP Victory )केला.
https://youtube.com/watch?v=Es6lIH7o43U&si=tNT9SU7-RzgeIUzZ
https://youtube.com/watch?v=Es6lIH7o43U&si=tNT9SU7-RzgeIUzZ
