पुणे, दि. १८ : पुणे ग्रँड चॅलेंज टूर–२०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावरील सर्व शासकीय व खासगी शाळांना मंगळवार, दि. २० जानेवारी २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी जारी केले (Pune Grand Tour)आहेत.
पुणे जिल्हा प्रशासन, बजाज आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६ ही युसीआय (UCI) मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा दि. १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल यांनी निश्चित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले (Pune Grand Tour) आहे.
दि. २० जानेवारी रोजी स्पर्धेचा पहिला टप्पा टी.सी.एल. सर्कल, हिंजवडी फेज-३ येथून सुरू होणार असून पुढे टी.सी.एस. सर्कल, मेगापोलीस सर्कल (सिंफोनी सोसायटी समोरून उजवीकडे वळत), बापुजी बुवा मंदिर मार्गे पुणे ग्रामीण हद्दीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर डोणे फाटा येथून पुन्हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करून रोहिदास मारुती सावळे चौक (डोणे फाटा) येथून डावीकडे वळत आढळे बुद्रुक, बेबड ओढा, चांदखेड, कासारसाई, नेरे, मारुंजी, लक्ष्मी चौक, भुमकर चौक अंडरपास, डांगे चौक अंडरपास मार्गे आदित्य बिर्ला हॉस्पिटल समोरून रिव्हर व्ह्यू चौक, वाल्हेकरवाडी(Pune Grand Tour) येथे पोहोचेल.
त्यानंतर वाल्हेकरवाडी टी-जंक्शन येथे डावीकडे वळून छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रावेत येथे उजवीकडे वळत स्पर्धेची सांगता डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज, आकुर्डी येथे होणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले (Pune Grand Tour)आहे.
