Home पुणे Pimpri Bus Fire:पीएमपीएमएल बसला लागलेली आग अग्निशमन दलाने त्वरित नियंत्रणात आणली

Pimpri Bus Fire:पीएमपीएमएल बसला लागलेली आग अग्निशमन दलाने त्वरित नियंत्रणात आणली

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी, दि. १६ नोव्हेंबर २०२५ : पिंपरीहून भोसरीकडे निघालेल्या पीएमपीएमएल बसला आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास पिंपरी चौकाजवळील कामगार भवनासमोर अचानक आग लागली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरी अग्निशमन केंद्रातील पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. बसचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी बसचालकाच्या प्रसंगावधानामुळे सर्व १५ प्रवासी सुरक्षित बाहेर पडले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब आहे.

 

पिंपरीतून भोसरीच्या दिशेने निघालेली ही पीएमपीएमएल बस महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून पुढे नेहरूनगरकडे रवाना झाली. लोखंडे कामगार भवनाजवळ पोहोचताच बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. चालकाने तत्परतेने बस थांबवून दरवाजे उघडले व प्रवाशांना धोका असल्याची सूचना देत सर्वांना सुरक्षितपणे खाली उतरवले. त्या वेळी बसमध्ये चालक, वाहक यांच्यासह १५ प्रवासी होते.

 

दरम्यान, बसला आग लागल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या मुख्यालयातून अग्निशमन दलाचे पथक तत्काळ रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोहोचताच प्रथम परिसर रिकामा करण्यात आला. इंजिन भागात आग लागल्यामुळे काही मिनिटांत ती भडकली होती; मात्र प्रशिक्षित जवानांनी त्वरित कारवाई करत आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळवले.

या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अग्निशमन दल आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तरीत्या मार्ग मोकळा करत परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

घटनास्थळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. अग्निशमन पथकामध्ये उप अग्निशमन अधिकारी गौतम इंगवले, लीडिंग फायरमन शहाजी कोपनर, यंत्रचालक मयूर कुंभार, जवान अतुल मोरे, प्रकाश गव्हाणे, पूजा वालगुडे, ओंकार गंगाड, हर्षल पवार, महेश गरड, सरिता जामणेकर आणि वैभव सोनवणे यांचा समावेश होता.

 

अशा प्रसंगी वाहनातून धूर किंवा अनैसर्गिक आवाज आढळल्यास त्वरित वाहन थांबवून सावधगिरी बाळगावी तसेच आग किंवा आपत्कालीन परिस्थिती आढळल्यास १०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन अग्निशमन विभागाने केले आहे.

अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया

जवानांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला”—

प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

 

 


https://youtube.com/watch?v=kmdwat_-zwY&si=oA5-hOoblmF4AnYw


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00