Home पुणे जीवन गौरव पुरस्कार, रक्तदान शिबिर आणि श्रीसूक्त हवनाने मोरया महोत्सवाचा चौथा दिवस संपन्न

जीवन गौरव पुरस्कार, रक्तदान शिबिर आणि श्रीसूक्त हवनाने मोरया महोत्सवाचा चौथा दिवस संपन्न

मोरया गोसावी महाराजांच्या 464 व्या समाधी संजीवन सोहळ्यात ‘इथेनॉल मॅन’ डॉ. प्रमोद चौधरी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान. रक्तदान शिबिर, योग, चरित्रपठण, भजन, हवन आणि आरोग्य शिबिर अशा विविध उपक्रमांनी चौथ्या दिवसाचा महोत्सव भावपूर्ण वातावरणात संपन्न.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :प्रतिष्ठेच्या मोरया गोसावी महाराज जीवन गौरव पुरस्काराने ‘इथेनॉल मॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. महासाधू मोरया गोसावी यांच्या 464 व्या समाधी संजीवन सोहळा महोत्सवाच्या चौथ्या दिवशी झालेल्या या प्रमुख कार्यक्रमात डॉ. चौधरी यांना हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर पिंपरी-चिंचवड देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वान्स, ऍड. देवराज डहाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

संजीवन सोहळा महोत्सवाच्या चौथ्या दिवसाची सुरुवात प्रथेप्रमाणे पहाटे 6 वाजता प्रसिद्ध चौघडा वादक नितीन दैठणकर यांच्या मंगलमय वादनाने झाली. त्यानंतर योगगुरू उजगावकर सर यांच्या सोहम योग साधना मंडळातर्फे योग सत्र घेण्यात आले. पुढे श्री. पाटील यांच्या रसाळ वाणीतील मोरया गोसावी महाराजांच्या चरित्र पठणाने भक्तिमय वातावरण अधिक रंगले.

 

सकाळी साडेनऊ वाजता चिंचवडमधील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश वैद्य यांच्या शंकर महाराज सेवा मंडळातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांच्या हस्ते झाले. या रक्तदान शिबिरात 70 दात्यांनी उत्साहाने रक्तदान केले. यावेळी अविनाश वैद्य, मनाली वैद्य आणि सेवा मंडळाचे सभासद उपस्थित होते.

 

याचवेळी वेदमूर्ती चंद्रशेखर रबडे गुरुजी यांनी मंत्रसुयक्त हवन संपन्न केले. तसेच डॉ. चंद्रशेखर देशमुख यांनी मोरया भक्तांसाठी आरोग्य शिबिर आयोजित केले होते, ज्यात अनेक गरजू रुग्णांनी आवश्यक तपासण्यांचा लाभ घेतला.

 

प्रथेप्रमाणे दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर स्थानिक भजनी मंडळातर्फे भक्तिरसपूर्ण भजन कार्यक्रम पार पडला.

 

दुपारनंतर डॉ. चंद्रशेखर देशमुख यांचे ‘आधुनिक आरोग्य आणि सुपरफास्ट आयुर्वेद’ या विषयावर व्याख्यान झाले. यात त्यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम स्पष्ट केले आणि त्यावरील आयुर्वेदीय उपायांचे महत्त्व सविस्तर सांगितले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00