चिंचवड (दि. ०४ फेब्रुवारी २०२६) :श्री क्षेत्र चिंचवड येथील श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिराला महाराष्ट्र शासनाने ‘क’ दर्जाचे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळ म्हणून घोषित केल्याची अत्यंत आनंदाची बातमी आहे. या घोषणेमुळे मंदिर परिसरातील भक्तांच्या सोयीसाठी तसेच मंदिराच्या जतन, संवर्धन व विविध विकासकामांसाठी राज्य शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला (Chinchwad Devasthan) आहे.
या विकासनिधीतून होणाऱ्या विविध कामांचे भूमिपूजन गुरुवार, दि. ०५ फेब्रुवारी २०२६ रोजी संकष्ट चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सायंकाळी ५.०० वाजता श्री मोरया गोसावी महाराज समाधी मंदिराच्या शेजारील पटांगणात होणार आहे. हा कार्यक्रम चिंचवड विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार श्री. शंकरशेठ जगताप यांच्या शुभहस्ते संपन्न होणार असून चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आदरणीय श्री. मंदार महाराज देव हे प्रमुख उपस्थित राहणार(Chinchwad Devasthan) आहेत.

या भूमिपूजन कार्यक्रमानंतर पवना नदीच्या स्वच्छतेबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने दर संकष्ट चतुर्थीला आयोजित करण्यात येणारी ‘पवनामाईची आरती’ यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न होणार(Chinchwad Devasthan) आहे.
या पवित्र व ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व मोरया भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र रमेश देव (विश्वस्त क्र. २) यांनी केले(Chinchwad Devasthan) आहे.
