पिंपरी-चिंचवड : पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाकड ते मामुर्डी दरम्यान निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी नवीन आठ ठिकाणी बॉक्स स्ट्रक्चर (अंडरपास) उभारण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. या कामासाठी आमदार शंकर जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत असून सध्या संबंधित कामांची तांत्रिक तपासणी सुरू असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी (Wakad Mamurdi Traffic) दिली.
मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार शंकर जगताप यांनी तारांकित प्रश्नाद्वारे वाकड ते मामुर्डी या पट्ट्यातील गंभीर वाहतूक समस्येचा मुद्दा सभागृहात मांडला. गेल्या काही वर्षांत या परिसरात हिंजवडी आयटी पार्क, शैक्षणिक संस्था तसेच मोठ्या गृहप्रकल्पांमुळे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. मात्र, महामार्गाची मर्यादित क्षमता आणि ग्रेड सेपरेटरच्या अभावामुळे स्थानिक वाहतूक आणि महामार्गावरील वाहने एकत्र येऊन वारंवार वाहतूक कोंडी होत असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून (Wakad Mamurdi Traffic)दिले.
या पार्श्वभूमीवर सयाजी अंडरपास, भुमकर चौक, ताथवडे, पुनावळे, पवना नदी क्रॉसिंग, किवळे जंक्शन आणि मामुर्डी आदी महत्त्वाच्या ठिकाणी बॉक्स स्ट्रक्चर उभारण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या अंडरपासमुळे महामार्ग क्रॉसिंग करणे सोपे होईल तसेच सेवा रस्त्यांवरील वाहतुकीचा ताणही कमी होण्यास मदत (Wakad Mamurdi Traffic) होईल.
प्रलंबित कामांमुळे वाढलेली वाहतूक कोंडी
दरम्यान, गेल्या आठ महिन्यांपासून सुरू असलेल्या संथ गतीच्या कामांमुळे वाकड, रावेत आणि परिसरात वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढले आहे. ही प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी आमदार जगताप यांनी सभागृहात केली. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आमदार जगताप यांनी सुचवलेल्या अंडरपास प्रकल्पांबाबत तांत्रिक माहिती संकलित करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले आणि लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट (Wakad Mamurdi Traffic) केले.
आमदार शंकर जगताप यांची प्रतिक्रिया
वाकड–मामुर्डी पट्ट्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आठ ठिकाणी बॉक्स स्ट्रक्चर उभारणार आयटी पार्कसह किवळे, रावेत, पुनावळे, ताथवडे आणि वाकड हा परिसर शहराच्या विकासाचा महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे महामार्गावरील प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करून नवीन आठ ठिकाणी अंडरपास उभारणे आवश्यक आहे. विधानसभेत हा प्रश्न मांडल्यानंतर शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून या कामांना गती देऊन हा परिसर वाहतूक कोंडीमुक्त करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी (Wakad Mamurdi Traffic) सांगितले.
