पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : राज्याचे मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्र घडविण्याचा व्यापक आराखडा असल्याचे मत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केले. हा अर्थसंकल्प शाश्वत, सर्वसमावेशक आणि प्रगत महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने महत्त्वाचा टप्पा ठरेल, असे त्यांनी (PCMC Growth Hub) म्हटले.
मुंबईच्या धर्तीवर पुणे, नाशिक, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ही शहरे ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याचा संकल्प या अर्थसंकल्पातून स्पष्ट होत असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले. त्यामुळे उद्योग, गुंतवणूक आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात पुणे जिल्ह्याला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त(PCMC Growth Hub) केला.
महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत (FDI) देशात अव्वल स्थानावर असून ‘वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट’ उपक्रमातही राज्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तसेच ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स (AVGC) क्षेत्रात पुण्याला जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प या अर्थसंकल्पातून मांडण्यात आला आहे. ‘इन्व्हेस्ट महाराष्ट्र’ डिजिटल प्लॅटफॉर्म आणि प्रत्येक जिल्ह्यात लघु-मध्यम उद्योग केंद्रे स्थापन करण्याच्या निर्णयामुळे सुमारे ५ दशलक्ष रोजगार निर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली(PCMC Growth Hub) आहे.
शेतकरी हितासाठी जाहीर करण्यात आलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने’ अंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे दोन लाख रुपयांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच Sant Tukaram महाराजांची जन्मभूमी देहूच्या विकास आराखड्याची अंमलबजावणी आणि तीर्थक्षेत्र विकासावर दिलेला भर वारकरी संप्रदायाचा सन्मान करणारा असल्याचे त्यांनी नमूद(PCMC Growth Hub) केले.
पुणे जिल्ह्यासाठी अनेक महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे. पुणे–शिरूर उन्नत मार्गासाठी ७,५१४ कोटी रुपये, तळेगाव–चाकण उन्नत मार्गासाठी ६,४९९ कोटी रुपये, तसेच चाकण–शिक्रापूर मार्गाचे सहापदरीकरण करण्यात येणार आहे. याशिवाय शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान १९२ किमीचा ग्रीनफील्ड महामार्ग उभारण्याची योजना आहे. ग्रामीण भागातील १००० पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांना काँक्रीट रस्त्यांनी जोडण्यासाठी ४,५०० कोटी रुपयांचा प्रकल्पही राबविण्यात येणार (PCMC Growth Hub)आहे.
वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुण्यात मुंबईच्या धर्तीवर भुयारी मार्ग व उन्नत मार्गांचे जाळे उभारले जाणार असून, विविध पायाभूत प्रकल्पांमुळे पुणे जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळेल, असे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. त्यांनी या अर्थसंकल्पाला ‘विकसित महाराष्ट्राचा गतिमान रोडमॅप’ असे संबोधत स्वागत (PCMC Growth Hub)केले.
