पिंपरी, दि. २० जानेवारी २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आशाकिरण सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर, चिंचवडगाव येथे आयोजित करण्यात आला (Suryanamskar Mahotsav) आहे.
महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपायुक्त पंकज पाटील व ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले (Suryanamskar Mahotsav)आहे.
विद्यार्थ्यांमध्ये योगसाधना, शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्थैर्य व शिस्तबद्ध जीवनशैली यांचे महत्त्व रुजविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या महोत्सवात पिंपरी चिंचवड महानगरपालिका शाळा तसेच खासगी शाळांमधील इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतचे विद्यार्थी सहभागी होणार असून, विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवर व सामाजिक कार्यकर्तेही उपस्थित राहणार(Suryanamskar Mahotsav) आहेत.
अशी करता येणार नावनोंदणी
जागतिक सूर्यनमस्कार महोत्सवासाठी २२ ते २४ जानेवारी २०२६ या कालावधीत दररोज सायंकाळी ४.०० ते ६.०० या वेळेत मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर, चिंचवडगाव येथे नावनोंदणी करता येणार आहे.तसेच ९४२२२३१५६९ या व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांकावरही नावनोंदणी करता येईल.नावनोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रविवार, दि. २५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर येथे मुख्य सूर्यनमस्कार महोत्सवास सुरुवात (Suryanamskar Mahotsav)होणार आहे.
