प्रतिनिधी : “पिंपरी चिंचवड महापालिकेने सार्वजनिक स्वच्छतेशी संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. १ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाने विविध नियमभंग प्रकरणांतून एकूण १,६०,७०० रुपये (pcmc-swachhta-action ) दंड वसूल केला.
ही मोहीम आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहायक आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली, तर ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली (pcmc-swachhta-action ) राबवण्यात आली.
फ क्षेत्रीय कार्यालयाची दंडात्मक कारवाई
-
बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर: ८५,००० रुपये
-
कचरा वर्गीकरण न करणे: १२,७०० रुपये
-
उघड्यावर कचरा टाकणे: ३४,००० रुपये
-
दुकानांमध्ये दोन डस्टबिन न ठेवणे: २६,००० रुपये
-
सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणे: ३,००० रुपये
या कारवाईत सहायक आरोग्य अधिकारी महेश आढाव, मुख्य आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर, आरोग्य निरीक्षक गौरव दराडे, महेंद्र साबळे, समाधान कातड आणि रामचंद्र शिंगाडे यांनी सक्रिय सहभाग (pcmc-swachhta-action ) घेतला.
“पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नियमभंगाविरोधातील धडक कारवाई पुढेही सुरू राहील.”
— डॉ. प्रदीप ठेंगल, उप आयुक्त, आरोग्य विभाग
“फ क्षेत्रीय कार्यालयाची कारवाई स्वच्छ पिंपरी-चिंचवड निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. नागरिकांनी स्वच्छतेसाठी (pcmc-swachhta-action ) सहकार्य करावे.”
— अतुल पाटील, क्षेत्रीय अधिकारी, फ कार्यालय
