Home पुणे Ladki Bahin Yojana | ई-केवायसी चुकलेल्या महिलांना दिलासा | अंगणवाडीमार्फत पडताळणी

Ladki Bahin Yojana | ई-केवायसी चुकलेल्या महिलांना दिलासा | अंगणवाडीमार्फत पडताळणी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या चुकांमुळे लाभ न मिळालेल्या महिलांसाठी राज्य सरकारचा दिलासादायक निर्णय. अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करून पात्र महिलांना योजनेचा लाभ दिला जाणार.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसी प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनेक महिलांची प्रक्रिया अपूर्ण राहिली होती. परिणामी, त्यांना योजनेचा हप्ता मिळू शकला (Ladki Bahin Yojana) नव्हता.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रशासनाला महत्त्वाच्या सूचना दिल्या असून, लाडकी बहीण योजना अंतर्गत जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ही पडताळणी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून क्षेत्रीय स्तरावर केली जाणार (Ladki Bahin Yojana )आहे .

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, तांत्रिक अडचणी किंवा चुकीचा पर्याय निवडल्यामुळे अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नव्हती. यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप केला(Ladki Bahin Yojana) आहे.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या विषयाची दखल घेत प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले आहेत. योजनेच्या निकषांनुसार पात्र असलेल्या महिलांची क्षेत्रीय पातळीवर प्रत्यक्ष तपासणी करून पात्रता निश्चित करावी, असे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले(Ladki Bahin Yojana )आहेत.

आदिती तटकरे यांनी काय स्पष्ट केले?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणात सुधारणा करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येत आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे. मात्र, काही महिलांकडून ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडण्यात आल्याचे निदर्शनास आले असून, त्यामुळे त्या महिलांना लाभापासून वंचित राहावे लागले.ही अडचण दूर करण्यासाठी आता अंगणवाडी(Ladki Bahin Yojana) सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करून पात्र महिलांना न्याय देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00