प्रतिनिधी :नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांना मतदान करता यावे, यासाठी २ डिसेंबर २०२५ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून, ही माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली (Pune Voting Holiday)आहे.
आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, माळेगाव बुद्रुक, मंचर, राजगुरुनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे आणि वडगाव या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या मतदारसंघांमध्ये(Pune Voting Holiday) ही सुट्टी लागू राहणार आहे.
मतदारसंघाच्या बाहेर कामानिमित्त असलेल्या पात्र मतदारांनाही या सुट्टीचा लाभ मिळणार आहे. केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय संस्था, सार्वजनिक उपक्रम, बँका आदी ठिकाणीही ही सार्वजनिक सुट्टी लागू असेल. पात्र मतदारांनी २ डिसेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन श्री. डुडी (Pune Voting Holiday) यांनी केले आहे.

