Home आरोग्य JP Health Drive:ज्ञान प्रबोधिनी निगडी पालक महासंघाचे ‘आरोग्यव्रत ’ व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

JP Health Drive:ज्ञान प्रबोधिनी निगडी पालक महासंघाचे ‘आरोग्यव्रत ’ व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ज्ञान प्रबोधिनी निगडी पालक महासंघाने आयोजित केलेल्या ‘आरोग्यव्रत ’ उपक्रमात 350+ पालकांची आरोग्य तपासणी व फिटनेस चाचण्या घेण्यात आल्या. तसेच दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासोबत आयोजित रक्तदान शिबिरात 125 जणांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:ज्ञान प्रबोधिनी निगडी पालक महासंघाच्या वतीने आयोजित ‘आरोग्यव्रत ’ व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. खेळाच्या उद्देशाने सुरुवात झालेला पालकांचा छोटा गट आज सात विभागांत कार्यरत असून शालेय विद्यार्थ्यांसह पालक आणि समाज या स्तरावर विविध उपक्रम राबवित आहे. महासंघाची व्याप्ती सातत्याने वाढत असून आरोग्य आणि क्रीडा हे दोन प्रमुख (JP Health Drive) केंद्रबिंदू बनले आहेत.

यावर्षीच्या क्रीडा उपक्रमांची सुरुवात थोड्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आली. शाळेतील सर्व पालकांसह परिसरातील नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात सहभागी पालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यात रक्त तपासणी, साखर, कोलेस्ट्रॉल, थायरॉइड, बीपी, हिमोग्लोबिन तसेच उंची–वजन मोजमाप समाविष्ट होते. त्यानंतर फिजिकल टेस्ट घेण्यात आल्या ज्यात बारा किलोमीटर चालणे किंवा धावणे, एक किलोमीटर रन, एक मिनिट पुष-अप आदी चाचण्यांचा (JP Health Drive) समावेश होता.

प्रत्येक सहभागी पालकासाठी वैयक्तिक व्यायाम कार्यक्रम तयार करून तो रोज सकाळी सात ते आठ या वेळेत शाळेच्या क्रीडांगणावर घेतला जात आहे. हा उपक्रम 26 जानेवारीपर्यंत चालणार असून शेवटी पुन्हा तपासणी करून प्रत्येक पालकातील आरोग्यदृष्ट्या झालेले बदल दाखवले जाणार आहेत. या उपक्रमात साडेतीनशेहून अधिक  (JP Health Drive) पालक सहभागी झाले आहेत.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील पालक महासंघ आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावर्षी हे शिबिर 22 नोव्हेंबर रोजी पार पडले. सध्या रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने शिबिराचे महत्त्व अधिक वाढले होते. या शिबिरात तब्बल 125 जणांनी स्वेच्छेने रक्तदान(JP Health Drive) केले.

ज्ञान प्रबोधिनी पालक महासंघाने आरोग्य, क्रीडा आणि समाजोपयोगी उपक्रमांचा समन्वय साधत केलेले हे आयोजन समाजासाठी प्रेरणादायी (JP Health Drive) ठरले आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00