Home पुणे NCP Elections 2025:पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी जोरात

NCP Elections 2025:पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी जोरात

शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसची कोअर कमिटी सक्रिय; इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विविध पक्षांच्या बैठकांचे सत्र सुरू असून, आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी प्रदेश पातळीवरील नेत्यांनी महापालिका निवडणुकीच्या नियोजनासाठी एक कोअर कमिटी जाहीर( NCP Elections 2025) केली होती.

कोअर कमिटीची बैठक ज्येष्ठ नेते आझमभाई पानसरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. बैठकीत आझमभाई पानसरे म्हणाले, “कोअर कमिटीच्या माध्यमातून निवडणूक नियोजनाला सुरुवात झाली आहे. सर्वप्रथम पक्षातील पदाधिकाऱ्यांशी उमेदवार म्हणून इच्छुक व्यक्तींची चर्चा केली जाईल. त्यानंतर संघटनेबाहेरील इच्छुक उमेदवारांचे अर्ज आम्ही मागवत आहोत. विधानसभानिहाय दोन-दोन आणि शहर पातळीवर दोन प्रतिनिधी निवडून इच्छुक उमेदवारांचा डेटा जमा केला जाईल. नंतर निवडणुकीची पुढील दिशा ठरवली  ( NCP Elections 2025)जाईल.”

पिंपरी-चिंचवड महापालिकेत गेल्या पाच-सात वर्षांपासून भोंगळ कारभार चालत होता, आता बदलाची वेळ आली आहे, असेही आझमभाई पानसरे यांनी सांगितले. शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा जोमाने काम सुरू करण्यात येत असल्याचे त्यांनी ( NCP Elections 2025)नमूद केले.

सदर बैठकीला कोअर कमिटीचे बहुतेक पदाधिकारी उपस्थित होते, तर काही कामानिमित्त अनुपस्थित होते. प्राथमिक तयारी झाल्यानंतर खासदार अमोल कोल्हे, रोहितदादा पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांचा मेळावा घेण्यात येणार असल्याचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे ( NCP Elections 2025) यांनी सांगितले.

यापूर्वी मार्गदर्शनासाठी महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे पिंपरी-चिंचवड शहरात येणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक चिंचवडगाव येथील विरंगुळा केंद्र येथे ( NCP Elections 2025) होणार आहे.

विधानसभा निहाय निवडणूक अर्ज स्वीकृती प्रतिनिधी:

  • शहर: तुषार कामठे, देवेंद्र तायडे

  • भोसरी: काशिनाथ जगताप, इम्रान शेख

  • पिंपरी: सुलक्षणा शिलवंत, संदीप चव्हाण

  • चिंचवड: सुनिल गव्हाणे, तुषार कामठे

इच्छुक उमेदवारांनी वरील पदाधिकाऱ्यांकडे आपले अर्ज सादर करण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले असल्याची माहिती शहर सरचिटणीस जयंत शिंदे( NCP Elections 2025) यांनी दिली.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00