प्रतिनिधी७ डिसेंबर : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे सुरू असून, महानगरपालिका निवडणुका देखील लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तर्फे निवडणूक तयारीला वेग आला (Rohini Khadse )आहे.
काही दिवसांपूर्वी प्रदेश पातळीवर निवडणुकीसाठी कोअर कमिटीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीनंतर, आज महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी पिंपरी-चिंचवड महिला आघाडीची बैठक घेऊन संघटनात्मक तयारीचा आढावा (Rohini Khadse )घेतला.
बैठकीत बोलताना रोहिणी खडसे म्हणाल्या, “शरद पवार साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण मिळवून दिले आहे. राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी या आरक्षणाचा पूर्ण लाभ घेऊन संधीचे सोने केले पाहिजे. सुरुवातीला अडचणी येतात, पण सातत्याने काम केल्यास यश निश्चित मिळते. घराचा उंबरा ओलांडून समाजकार्यासाठी पुढे येणे आवश्यक (Rohini Khadse )आहे.
विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे म्हणाले, “आपल्या विरोधात किंवा सोबत कोण लढणार याचा विचार न करता महिलांनी निवडणुकीची तयारी तात्काळ सुरू केली पाहिजे. यामुळे त्यांचे राजकीय आणि सामाजिक स्थान अधिक बळकट (Rohini Khadse )होईल.
शहर महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर यांनी माहिती दिली की, “प्रत्येक प्रभागातून महिलांकडून उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. हे अर्ज लवकरच कोअर कमिटीसमोर सादर करण्यात (Rohini Khadse )येतील.
बैठकीदरम्यान महिला पदाधिकाऱ्यांनी शहरातील अनियमित पाणीपुरवठा, महिला स्वच्छतागृहे, महिला सुरक्षितता आणि इतर स्थानिक समस्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांच्यासमोर मांडल्या.
या बैठकीला शहर कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, प्रदेश संघटक सचिव संदीप चव्हाण, चिंचवड विधानसभा अध्यक्षा सोनल पासलकर, भोसरी विधानसभा अध्यक्षा सारिका हरगुडे, पिंपरी विधानसभा अध्यक्षा कल्पना घाडगे, माजी नगरसेविका प्रियांका बारसे, विद्यार्थी शहराध्यक्ष राहुल आहेर, सामाजिक न्याय शहराध्यक्ष मयूर जाधव, प्रवक्ते माधव पाटील, अरुण पवार, चिंचवड कार्याध्यक्ष सुवर्णा वाळके, पिंपरी कार्याध्यक्ष बबिता बनसोडे, प्रफुल्ला मोतीलिंग आणि इतर अनेक पदाधिकारी उपस्थित (Rohini Khadse ) होते.
