पिंपरी, दि. १६ जानेवारी :भारतीय जनता पक्षाने निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली असून पक्षाने दाखवलेला विश्वास सुज्ञ मतदारांच्या पाठिंब्यामुळे सार्थ ठरला आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यांच्या विरोधात लढवली गेली असली, तरी नागरिकांनी विकासाचे ‘व्हिजन’ ठामपणे स्वीकारले. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून ही विकासाची घोडदौड आता अधिक वेगाने सुरू राहणार आहे, अशी ग्वाही निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप (MLA Shankar Jagtap) यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर संवाद साधताना आमदार जगताप म्हणाले की, १५ जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली, तर १६ जानेवारी रोजी निकाल घोषित झाले. या निकालात पिंपरी-चिंचवडच्या सुज्ञ नागरिकांनी भारतीय जनता पक्षाला भरभरून कौल दिला आहे. याबद्दल भारतीय जनता पक्ष पिंपरी-चिंचवडमधील सर्व नागरिकांचा मनःपूर्वक आभारी (MLA Shankar Jagtap)आहे.
ते पुढे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध आहे. पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, सार्वजनिक वाहतूक, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत विषयांवर ठोस आणि दूरगामी निर्णय घेतले जातील. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर शहराचा विकास करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. उद्योगपूरक वातावरण निर्माण करून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना राबवण्यात(MLA Shankar Jagtap) येणार आहेत.
शहराच्या विकास प्रक्रियेत नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा असून पारदर्शक, गतिमान आणि उत्तरदायी प्रशासन देणे ही आमची प्राथमिकता राहील. नियोजन, व्यवस्थापन आणि प्रभावी अंमलबजावणी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा वेग अधिक वाढवला जाईल. विरोधकांनी विकासाऐवजी नकारात्मक राजकारणाचा मार्ग स्वीकारला, मात्र नागरिकांनी सकारात्मक विचार करत विकासालाच पसंती दिली, हे या निकालातून स्पष्ट झाले (MLA Shankar Jagtap)आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला महाराष्ट्रातील एक आदर्श आणि विकसित शहर बनवण्यासाठी भारतीय जनता पक्ष सातत्याने आणि प्रामाणिकपणे काम करत राहील, असा विश्वास आमदार शंकर जगताप यांनी यावेळी व्यक्त (MLA Shankar Jagtap)केला.
