Home क्रीडा T -20 World Cup :कोण होईल विश्वविजेता? भारत की न्यूझीलंड – आज संध्याकाळी होणार फैसला!

T -20 World Cup :कोण होईल विश्वविजेता? भारत की न्यूझीलंड – आज संध्याकाळी होणार फैसला!

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-20 विश्वचषक अंतिम सामना आज; कोण ठरणार विश्वविजेता? सूर्याकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इतिहास रचणार का, की न्यूझीलंड पुन्हा एकदा धक्का देणार? रोमांचक अंतिम लढतीकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष.

by Admin
Spread the love

(विवेक कुलकर्णी ) क्रिकेट चाहत्यांची धडधड वाढवणारा क्षण अखेर आज येऊन ठेपला आहे. अंतिम सामन्यात आमनेसामने उभे ठाकले आहेत भारत विरुद्ध न्यूझीलंड  कोण उचलणार विश्वचषकाचा मानाचा तुरा? याचे उत्तर आज संध्याकाळी मिळणार (T -20 World Cup) आहे.

स्पर्धेच्या सुरुवातीला भारतीय संघाची वाटचाल थोडी अडखळतच सुरू झाली. विशेषत: सुपर-८ फेरीत याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेकडून तब्बल ७२ धावांनी झालेला पराभव भारतीय संघासाठी मोठा धक्का होता. त्या पराभवानंतर संघावर आणि कर्णधारावर टीकेची झोड उठली होती. अनेकांनी संघाच्या निवडीवर, फलंदाजीवर आणि गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित (T -20 World Cup)केले.

मात्र खरा संघ तोच, जो संकटात उभा राहतो. या टीकेने खचून न जाता कर्णधार सूर्याकुमार यादव आणि त्याच्या सहकाऱ्यांनी खेळाची दिशा बदलून टाकली. नॉकआउट फेरीत त्यांनी दमदार खेळ करत वेस्ट इंडिजसारख्या धोकादायक संघाला पराभूत केले आणि उपांत्य फेरीत प्रवेश (T -20 World Cup) केला .

उपांत्य फेरीत तर क्रिकेटच्या जनकाला म्हणजेच इंग्लंडला रोमहर्षक लढतीत ७ धावांनी मात देत भारताने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. त्या सामन्यात भारतीय खेळाडूंनी दाखवलेला जिद्दीचा खेळ आजही चाहत्यांच्या डोळ्यांसमोर ताजा (T -20 World Cup)आहे.

भारतासाठी इतिहास घडवण्याची संधी

आजचा सामना भारतीय संघासाठी ऐतिहासिक ठरू शकतो. कारण टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात आजपर्यंत कोणत्याही संघाने तीन वेळा विजेतेपद पटकावलेले नाही. तसेच यजमान संघाने स्पर्धा जिंकण्याचा योगही फार क्वचित आला आहे. हा इतिहास बदलण्याची नामी संधी भारताकडे(T -20 World Cup) आहे.

भारतीय संघाकडे प्रतिभावान खेळाडूंची फौज आहे. कर्णधार सूर्याकुमार यादव याची आक्रमक फलंदाजी, युवा फलंदाज अभिषेक शर्मा याची स्फोटक सुरुवात, फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती रहस्यमय गोलंदाजी, तसेच ईशान किशन आणि संजू सॅमसन यांची धडाकेबाज फलंदाजी संघाला मजबूत(T -20 World Cup) बनवते.

 

याशिवाय अष्टपैलू हार्दिक पांड्या , विश्वासार्ह अक्षर पटेल , आक्रमक शिवम दुबे आणि गोलंदाजीतील भारताचे ब्रह्मास्त्र जसप्रीत बुमराह यांच्यासारखे खेळाडू संघाला आणखी धार देतात. त्यामुळे कागदावर पाहता भारतीय संघ अधिक संतुलित आणि मजबूत(T -20 World Cup) दिसतो.

किवी संघही तितकाच धोकादायक 

मात्र समोरचा संघ न्यूझीलंड आहे, हे विसरून चालणार नाही. शांत, संयमी आणि योजनाबद्ध क्रिकेट खेळणारा हा संघ अनेक वेळा मोठ्या संघांना धक्का देत आला(T -20 World Cup) आहे.

भारतीय चाहत्यांच्या आठवणीत अजूनही ते प्रसंग ताजे आहेत—जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताला दिलेला पराभव, चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताच्या हातातून निसटलेले जेतेपद आणि नुकतीच भारतातच कसोटी मालिकेत मिळवलेला ३-० असा ऐतिहासिक विजय. एवढेच नाही, तर एकदिवसीय मालिकेतही त्यांनी भारताला अनेक वर्षांनंतर पराभूत (T -20 World Cup)केले.

म्हणूनच न्यूझीलंडला कमी लेखणे भारतासाठी धोकादायक ठरू (T -20 World Cup)शकते.

टी-२० क्रिकेट… कुणाच्याही बाजूने फिरणारा खेळ

टी-२० क्रिकेट हा तसा अनिश्चिततेचा खेळ. इथे एक चांगला ओव्हर, एक जबरदस्त षटकार किंवा एखादी अप्रतिम कॅच सामना फिरवू शकते. त्यामुळे अंतिम सामन्यात जो संघ दबाव सांभाळून सर्वोत्तम खेळ करेल तोच विश्वविजेता ठरणार (T -20 World Cup)आहे.

मन मात्र भारताच्याच बाजूने

कागदावर तुलना, आकडेवारी, खेळाडूंची फॉर्म यावर चर्चा होत राहील. तज्ज्ञ आपापले अंदाज मांडतील. पण प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्याच्या मनात एकच इच्छा आहे—आजचा दिवस भारताचा असावा आणि विश्वचषक पुन्हा एकदा आपल्या तिरंग्याच्या छायेखाली (T -20 World Cup)यावा.

सामना रंगतदार होणार यात मुळीच शंका नाही. मैदानावर न्यूझीलंडचा संयम आणि भारताचा आक्रमकपणा यांची खरी कसोटी लागणार आहे.

आता प्रश्न फक्त एकच—

विश्वविजेता कोण? भारत की न्यूझीलंड?

तुमचे मत (T -20 World Cup)काय?

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00