पुणे, प्रतिनिधी —पुणे पुस्तक महोत्सव यंदा १३ ते २० डिसेंबरदरम्यान आयोजित करण्यात येत असून उद्घाटन सोहळ्यास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशभरातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाची गुणवत्ता वाढवण्यासाठी विविध उपक्रम आखण्यात आले असून “पुणे पुस्तक महोत्सव भविष्यात जगाच्या पुस्तक राजधानीसारखी ओळख निर्माण करेल,” असे मत मंत्री (Pune Book Festival-2025)चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले
पुणे पुस्तक महोत्सव २०२५ च्या मांडव उभारणी आणि वास्तुपूजन समारंभात ते बोलत होते.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यवाह प्रवीण दबडघाव, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष मिलिंद मराठे, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू पराग काळकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे डॉ. यशराज पाटील, उद्योजक कृष्णकुमार गोयल, विशाल चोरडिया, डेक्कन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रमोद रावत, ज्येष्ठ पत्रकार किरण ठाकूर, अभिनेते प्रवीण तरडे, रमेश परदेशी आणि मुख्य संयोजक राजेश पांडे उपस्थित (Pune Book Festival-2025 ) होते.
—
“पुणे महोत्सवाला जागतिक स्तराची गरज” — जिल्हाधिकारी डूडी
जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले की त्यांचे मूळ गाव जयपूर असून तेथील जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल मोठ्या प्रमाणावर साजरा होतो आणि त्यातून मोठी आर्थिक उलाढाल होते. पुणे हे शिक्षणाचे आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर असल्याने येथे आयोजित होणाऱ्या पुस्तक महोत्सवाला जागतिक स्तराची (Pune Book Festival-2025) ओळख मिळाली पाहिजे.
मागील वर्षी २५ लाखांहून अधिक लोकांनी पुणे पुस्तक महोत्सवाला भेट दिली होती. यंदा या कार्यक्रमाला जागतिक रूप देण्याचा प्रयत्न आहे. पुढील वर्षी वर्ल्ड बुक फेस्टिव्हल पुण्यात भरवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी( Pune Book Festival-2025)सांगितले.
ते पुढे म्हणाले की सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे तरुणांमध्ये वाचनाचे प्रमाण कमी होत आहे. पुण्यात ७० विद्यापीठे आणि ७५० महाविद्यालये असून त्यांनी या महोत्सवात सक्रियपणे सहभागी व्हायला हवे. चांगली पिढी घडवणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे आणि वाचन संस्कृतीस प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेही पुण्यात मोठ्या (Pune Book Festival-2025) संधी आहेत.
बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद
राजेश पांडे म्हणाले की पहिल्या वर्षी २५० स्टॉल होते, दुसऱ्या वर्षी ६५० झाले आणि यंदाच्या वर्षी पहिल्याच टप्प्यात ८०० स्टॉलची नोंदणी पूर्ण झाली आहे. दिल्लीत आयोजित होणाऱ्या जागतिक पुस्तक महोत्सवानंतर पुणे पुस्तक महोत्सव हा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा महोत्सव ठरल्याचे (Pune Book Festival-2025 )त्यांनी सांगितले.
सात दिवसांत विविध कार्यक्रमांचे (Pune Book Festival-2025)आयोजन करण्यात आले असून देशभरातून १५० व्याख्याते सहभागी होणार आहेत. तसेच सुमारे ७० पुस्तकांचे प्रकाशनही या (Pune Book Festival-2025) महोत्सवात होणार आहे.
