Home गुन्हे Andekar Gang Arrest:आंदेकर टोळीच्या म्होरक्याची नाना पेठेत पोलिसांकडून धिंड; शहरात मोठी कारवाई

Andekar Gang Arrest:आंदेकर टोळीच्या म्होरक्याची नाना पेठेत पोलिसांकडून धिंड; शहरात मोठी कारवाई

by Admin
Spread the love

पुणे | प्रतिनिधी:पुणे शहरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात आंदेकर टोळीवर अंकुश ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई केली. टोळीचा मुख्य नेता कृष्णा बंडू आंदेकर (वय 28), त्याचा चुलत भाऊ शिवराज उदयकांत आंदेकर (वय 25) आणि अभिषेक उदयकांत आंदेकर (वय 23) यांना पोलिसांनी नाना पेठेतील डोके तालीम तसेच गणेश पेठ परिसरातून अटक करून हातात बेड्या ठोकत धिंड काढली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या (Andekar Gang Arrest) आदेशानुसार करण्यात आली.

५ सप्टेंबर २०२५ रोजी नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी बंडू आंदेकर टोळीने गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर (वय 24) याचा भरदिवसा पिस्तुलातून गोळीबार करून खून केला होता. त्यानंतर कोंढवा परिसरात वनराजे खून प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा भाऊ गणेश काळे याचा देखील गोळीबार करून खून करण्यात आला. या सलग हत्याकांडांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले (Andekar Gang Arrest) होते.

दरम्यान, आंदेकर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत कारवाई सुरू आहे. टोळीच्या बेकायदा बांधकामांवर बुलडोझर चालविण्यात आला असून, कृष्णा आंदेकर आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या बँक खात्यांवर गोठवणीची कारवाई करण्यात आली आहे. कोथरूड परिसरातील नीलेश घायवळ, गजानन मारणे, टिपू पठाण यांच्यासह आंदेकर टोळीला मिळणारी आर्थिक रसद तोडण्याचे स्पष्ट निर्देश  (Andekar Gang Arrest)आयुक्तांनी दिले आहेत.

“गुंडांच्या आर्थिक कणा मोडायचा आहे. त्यांनी दहशतीच्या आधारावर उभारलेल्या बेकायदा मालमत्तांची जप्ती करा आणि त्यांच्या व्यवहारांची प्राप्तिकर विभागाकडून चौकशी करा,” असे कठोर आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत. तसेच सोशल मीडियावर गुंडगिरीचे उदात्तीकरण करणारी व्हिडिओज प्रसारित करणाऱ्या सराईतांवरदेखील कठोर कारवाईचे आदेश देण्यात (Andekar Gang Arrest) आले आहेत.

शहरात सलग घडणाऱ्या टोळीयुद्धांमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणात या कारवाईमुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाल्याचे नागरिकांनी (Andekar Gang Arrest) व्यक्त केले आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00