Home पुणे Vilas Lande MLA :पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत विलास लांडे आघाडीवर; राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती स्पष्ट

Vilas Lande MLA :पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत विलास लांडे आघाडीवर; राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती स्पष्ट

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला टक्कर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार विलास लांडे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची पिंपरी-चिंचवड जिल्हा समन्वयकपदी नियुक्ती केली असून या निर्णयाचे उत्स्फूर्त स्वागत लांडे समर्थकांमध्ये दिसून आले. त्यांच्या प्रतिक्रिया म्हणून ‘टायगर इज बॅक’ असा (Vilas Lande MLA) संदेशही जोरदारपणे उमटला.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी जंबो कार्यकारिणी जाहीर केली होती. त्या यादीत विलास लांडे यांचे नाव मुख्य समन्वयक म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र त्या पत्रकार परिषदेला ते उपस्थित नव्हते, (Vilas Lande MLA) यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते.

 

दरम्यान, आकुर्डी परिसरातील एका गृहप्रकल्पाच्या अश्लील जाहिरातीबाबत संबंधित बांधकाम व्यावसायिकावर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते.

नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना विलास लांडे म्हणाले की,

पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे मनःपूर्वक आभार. ही जबाबदारी पूर्ण समर्पणाने आणि यशस्वीपणे पार पाडण्याचा मला दृढ विश्वास आहे.

 विकासकामांना गती देणे, नवीन पायाभूत सुविधा उभ्या करणे आणि नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणे—या सर्व बाबींमध्ये मी पक्षाच्या पाठीशी ठामपणे राहणार आहे. माझ्यासोबत समन्वयक म्हणून निवड झालेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन.”

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00