Home गुन्हे Mahalunge Robbery:महाळुंगेत दिवसा घरफोडी; २४ तासांत महिला अटकेत, १३.८७ लाखांचे दागिने जप्त

Mahalunge Robbery:महाळुंगेत दिवसा घरफोडी; २४ तासांत महिला अटकेत, १३.८७ लाखांचे दागिने जप्त

सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांची जलद कारवाई

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : दिवसा घरफोडी करून लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या एका महिलेला दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. पोलिसांनी चोरीला गेलेले सुमारे १० तोळे सोन्याचे दागिने असा एकूण १३ लाख ८७ हजार रुपयांचा १०० टक्के मुद्देमाल हस्तगत केला (Mahalunge Robbery) आहे.

 

या प्रकरणी सारिका संतोष भुजबळ (वय ३८, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ) हिला अटक करण्यात आली आहे. याबाबत दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल करण्यात आली (Mahalunge Robbery)होती.

 

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. तपासात समोर आले की, आरोपी महिला फिर्यादीच्या परिचयातील होती. फिर्यादीच्या घरी दागिने कुठे ठेवले आहेत, याची तिला माहिती(Mahalunge Robbery) होती.

 

याचाच फायदा घेत तिने बनावट चावी तयार केली. फिर्यादी घराबाहेर असताना दरवाजा उघडून कपाटातील १३ लाख ८७ हजार रुपये किमतीचे दागिने चोरून (Mahalunge Robbery)नेले.

 

कौशल्यपूर्ण तपासानंतर आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत तिने गुन्ह्याची कबुली दिली असून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला (Mahalunge Robbery)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00