Home आरोग्य Pavana Dam:पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर; पिंपरी-चिंचवडकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Pavana Dam:पवना धरणातील पाणीसाठा ३९ टक्क्यांवर; पिंपरी-चिंचवडकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

उन्हाळ्यामुळे बाष्पीभवन वाढले, शहरातील पाण्याची मागणीही वाढली

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : शहराचा मुख्य पाण्याचा स्रोत असलेल्या पवना धरणात आता केवळ ३९ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. वाढत्या उन्हामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत असून शहरातील पाण्याची मागणीही वाढली आहे. त्यामुळे धरणातील साठा झपाट्याने कमी होत (pavna Dam)आहे.

 

जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, हा उपलब्ध साठा पिंपरी-चिंचवड शहरासह संबंधित भागांना जूनअखेरपर्यंत, म्हणजे पावसाळा सुरू होईपर्यंत पुरवावा लागणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक ठरणार (pavna Dam)आहे.

 

३० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहराची पाण्याची गरज प्रामुख्याने पवना धरणावर अवलंबून आहे. समन्यायी पाणीवाटपासाठी शहरात गेल्या साडेसहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात (pavna Dam), आहे .

 

महापालिका दररोज रावेत बंधाऱ्यातून ५२० एमएलडी पाणी उचलते. तसेच आंद्रा धरण योजनेतून ९० एमएलडी आणि एमआयडीसीकडून ३० एमएलडी पाणी घेऊन शहरातील विविध भागांना पुरवठा केला (pavna Dam)जातो.

 

दरम्यान, उन्हाळ्याची तीव्रता वाढत असल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्रशासनाने केले (pavna Dam)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00