Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Traffic change:डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहतुकीत बदल

PCMC Traffic change:डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त वाहतुकीत बदल

गर्दी व्यवस्थापनासाठी अनेक रस्ते बंद राहणार असून पर्यायी मार्गांची घोषणा करण्यात आली आहे.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी पिंपरी येथील आंबेडकर पुतळा स्मारकावर मोठ्या प्रमाणात अनुयायी भेट देण्यासाठी येतात. वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितता आणि वाहतूक नियंत्रण सुनिश्चित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने शहरातील मध्यवर्ती भागात महत्त्वपूर्ण वाहतूक बदल जाहीर केले आहेत. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी हे आदेश जारी केले असून, हे निर्बंध ६ डिसेंबर रोजी दुपारी १२ ते रात्री १० वाजेपर्यंत लागू राहतील. वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात (PCMC Traffic change) आले आहे.

वाहतूक बंद राहणारे प्रमुख मार्ग आणि पर्यायी रस्ते

१) चिंचवड (महावीर चौक) – पिंपरी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक)

या दरम्यान सेवा रस्त्याने येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी असेल.

२) कासारवाडी (नाशिक फाटा चौक) – पिंपरी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक)

या पूर्ण मार्गावरील वाहन वाहतूक बंद राहील.

३) पिंपरी रेल्वे स्थानक (स्व. इंदिरा गांधी पूल) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक

या मार्गावर वाहनांना प्रवेश बंद.

पर्यायी मार्ग: मोरवाडी चौक मार्गे(PCMC Traffic change) पुढील प्रवास करावा.

४) नेहरूनगर चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक

या मार्गावरील वाहतूक बंद राहील.

पर्यायी मार्ग: एच.ए. कॉर्नर बस थांबा – मासुळकर कॉलनी मार्गे प्रवास करावा.

वाहतूक शाखेने नागरिकांना कळविले आहे की, गर्दी टाळण्यासाठी आणि सुरळीत वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी या तात्पुरत्या बदलांचे पालन करावे आणि वाहतूक पोलिसांना आवश्यक( PCMC Traffic change)ते सहकार्य द्यावे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00