पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२६) : “विश्वास, मेहनत आणि स्वयंशिस्त या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास यश निश्चित मिळते,” असे प्रतिपादन संत तुकारामनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक हृषीकेश कांबळे यांनी (Soham Public Library) केले.
७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहम् सार्वजनिक ग्रंथालय, पिंपरी यांच्या वतीने आयोजित स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांच्या मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक जितेंद्र ननावरे, नगरसेविका वर्षा जगताप तसेच सोहम् सार्वजनिक ग्रंथालयाचे संस्थापक अध्यक्ष जगन्नाथ नेरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात (Soham Public Library )आली.
प्रास्ताविकात जगन्नाथ नेरकर यांनी सांगितले की, सोहम् सार्वजनिक ग्रंथालय हे पिंपरी-चिंचवड शहरातील चोवीस तास अभ्यासिकेची सुविधा असलेले एकमेव ग्रंथालय आहे. येथील अभ्यासिकेतून आजपर्यंत हजारो विद्यार्थी प्रशासकीय सेवेत निवडले गेले असून ते देशसेवेत कार्यरत आहेत. तसेच ग्रंथालयातील समृद्ध संदर्भग्रंथांचा उपयोग पीएच.डी. (विद्यावाचस्पती) संशोधनासाठीही विद्यार्थ्यांनी करावा, असे आवाहन त्यांनी (Soham Public Library) केले.
मार्गदर्शन करताना हृषीकेश कांबळे यांनी आपल्या वैयक्तिक अनुभवांचे कथन करत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला व स्पर्धा परीक्षेच्या तयारीबाबत मोलाचे मार्गदर्शन (Soham Public Library) केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भास्कर चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन परमेश्वर तेलंगे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी उपस्थित (Soham Public Library) होते.
