Home प्रेरणा / यशकथा We Together Foundations:वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त सैनिकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

We Together Foundations:वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त सैनिकांचा सन्मान सोहळा उत्साहात संपन्न

२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त चिंचवड येथे वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने सैनिकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. माजी सैनिकांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

by Admin
Spread the love

चिंचवड : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने सैनिकांचा सन्मान सोहळा चिंचवड येथील यशस्वी क्लासेस हॉलमध्ये मोठ्या उत्साहात पार (We Together Foundations)पडला.

कार्यक्रमाची सुरुवात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वजास सलामी देत राष्ट्रगीताने करण्यात आली. यावेळी फाउंडेशनच्या सहसचिव मंगला डोळे-सपकाळे व महिला समन्वयक अपर्णा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली “गर्जा महाराष्ट्र माझा” हे गीत सामूहिकरित्या गायले (We Together Foundations) गेले.

या सोहळ्यात फाउंडेशनच्या वतीने सैनिकांचा सन्मान करण्यात आला व देशसेवेसाठी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे हे (We Together Foundations)होते.

अध्यक्षीय भाषणात मधुकर बच्चे म्हणाले, “सैनिक हा देशाचा कायमचा अभिमान आहे. निवृत्तीनंतरही अनेक माजी सैनिक समाजासाठी देशसेवेच्या भावनेतून सामाजिक कार्य करत असतात. त्यांच्या कर्तृत्वाचा, शिस्तीचा आणि अनुभवाचा समाजाला निश्चितच लाभ होतो. त्यामुळे अशा माजी सैनिकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात सन्मानाने स्थान दिले पाहिजे.”यावेळी उपस्थित सैनिकांनीही आपल्या भावना व्यक्त करत देशसेवेतील अनुभव उपस्थितांसमोर (We Together Foundations)मांडले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सलीम सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन फाउंडेशनच्या सहसचिव मंगला डोळे-सपकाळे यांनी केले. उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार रवींद्र सागडे, खुशाल दुसाने, महिला समन्वयक अपर्णा कुलकर्णी, संस्थापक क्रांती कुमार कडूलकर यांच्यासह दारासिंह मन्हास, जावेद शेख, नंदकुमार वाडेकर, लता शिंदे, मेघना बेरी, दिलीप पेटकर, अर्जुन पाटोळे, विलास रासकर, सरिता कुलकर्णी, ओम सोनी, उदय कुलकर्णी, रोहिणी बच्चे, हनीफ सय्यद, अनिल पोरे, अनिल शिंदे, भावीन भंडारी, श्रावणी बच्चे, निलेश आकारे, शंकर कुलकर्णी, आसावरी बच्चे, विलास गटने, अशोक देशपांडे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम(We Together Foundations) घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी फाउंडेशनचे सल्लागार खुशाल दुसाने यांनी आभार प्रदर्शन(We Together Foundations) केले.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00