पिंपरी :संत तुकारामनगर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देशभक्तीपर गीतांवर नृत्य, घोषणाबाजी तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात (Workers Welfare Board) आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव शिर्के होते. यावेळी ते म्हणाले, “मी पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा साक्षीदार आहे.” पिंपरी-चिंचवड हे औद्योगिक शहर असल्याने येथे कामगार कवी संमेलन आयोजित करण्यात यावे. तसेच कामगारांना बस प्रवासात सवलत देऊन गुणवंत कामगारांसाठी ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणे ‘लाडका गुणवंत कामगार’ योजना राबवून शासनाने पेन्शन द्यावी, अशी मागणी त्यांनी (Workers Welfare Board)केली.
मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी तरुणाई मोबाईलच्या व्यसनाधीन होत चालल्याने पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली. राष्ट्रीय सणाच्या दिवशी ध्वजारोहणास उपस्थित न राहता भटकंती करणे लोकशाहीसाठी घातक असल्याचे त्यांनी सांगून सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन(Workers Welfare Board) केले.
प्रमुख पाहुणे प्रकाश घोरपडे म्हणाले की मुलांमध्ये देशभक्ती रुजविण्याची जबाबदारी शिक्षकांबरोबरच पालकांचीही आहे. गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर काही कामगार उपक्रमांपासून दूर राहतात, असे आढळून येत असल्याने अशा कामगारांकडून पुरस्कार परत घेतला पाहिजे, असे मत त्यांनी (Workers Welfare Board) मांडले.
ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक यांनी हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून देशासाठी कार्य करण्याचे आवाहन करत देशभक्तीपर कविता सादर (Workers Welfare Board) केली.
सुदाम शिंदे यांनी केंद्राच्या स्थापनेसाठी केलेल्या प्रयत्नांचा उल्लेख करत, यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या केंद्राची सध्याची दुरवस्था पाहून खंत व्यक्त (Workers Welfare Board) केली.
यावेळी रोहिणी मिश्रा, समीक्षा क्षीरसागर आणि अनुराधा क्षीरसागर यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करून उपस्थितांची मने (Workers Welfare Board) जिंकली.
