पुणे, दि. २७ :बँकांचे कामकाज आठवड्यातील केवळ पाच दिवस करण्याच्या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने मंगळवारी (दि. २७) देशव्यापी बँक संप पुकारण्यात आला आहे. या संपामध्ये सर्व राष्ट्रीयकृत बँकांमधील अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार (Bank Strike) आहेत.
या पार्श्वभूमीवर पुणे येथील **स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)**च्या मुख्य शाखेसमोर सर्व बँकांचे अधिकारी व कर्मचारी निदर्शने करणार आहेत. मार्च २०२४ मध्ये झालेल्या द्विपक्षीय करारामध्ये बँकांचे कामकाज आठवड्यातील पाच दिवस करण्यास मान्यता देण्यात आली होती. मात्र, कराराला दोन वर्षे उलटूनही अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपाचा मार्ग स्वीकारल्याची माहिती स्टेट बँक वर्कर्स ऑर्गनायझेशनचे सरचिटणीस राजेश मुळे यांनी(Bank Strike) दिली.
सध्या बँक कर्मचारी मोठ्या प्रमाणावर कामाच्या तणावाखाली असून, पाच दिवसांचा कामकाजाचा आठवडा लागू करणे आता अनिवार्य झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. इन्शुरन्स क्षेत्र, रिझर्व्ह बँक, शेअर बाजार तसेच अनेक सरकारी व निमसरकारी वित्तीय संस्थांमध्ये पाच दिवसीय कामकाजाची अंमलबजावणी सुरू असताना, बँकिंग क्षेत्रात मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे त्यांनी स्पष्ट (Bank Strike) केले.
केंद्र सरकारने लवकरात लवकर पाच दिवसांच्या बँकिंग आठवड्याची अंमलबजावणी न केल्यास, भविष्यात अधिक कठोर पावले उचलण्याचा इशारा देखील मुळे यांनी दिला (Bank Strike) आहे.
