मुंबई : बदलत्या पत्रकारितेचे स्वरूप, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वाढता प्रभाव आणि माध्यम क्षेत्रासमोरील विविध आव्हानांवर चर्चा घडवून आणण्यासाठी मराठी पत्रकार संघातर्फे राज्यस्तरीय महाअधिवेशन २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. हे अधिवेशन मंगळवार, दि. ९ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत यशवंतराव चव्हाण सेंटर, नरिमन पॉइंट, मुंबई येथे होणार (Marathi Patrakar Sangh)आहे.
राज्यातील पत्रकार, वृत्तछायाचित्रकार, डिजिटल कंटेंट क्रिएटर्स तसेच पत्रकारिता विषयाचे विद्यार्थी यांच्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अधिवेशनात पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा, संघटनात्मक विषयांवरील मंथन आणि विविध ठराव मांडले जाणार (Marathi Patrakar Sangh)आहेत.
अधिवेशनाचे प्रमुख आकर्षण म्हणजे पत्रकारितेतील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत आयोजित विशेष प्रशिक्षण सत्र. हिंदुस्तान टाइम्सचे डिजिटल संपादक हरीश शेख हे AI चा पत्रकारितेतील वापर, डेटा विश्लेषण, स्वयंचलित लेखन, मजकूर प्रक्रिया आणि तथ्य पडताळणी याबाबत मार्गदर्शन करणार (Marathi Patrakar Sangh)आहेत.
दुपारच्या सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रेरणादायी वक्ते गौर गोपाल दास ‘माध्यमकर्मींचे मानसिक आरोग्य’ या विषयावर विशेष व्याख्यान देणार आहेत. माध्यम क्षेत्रातील वाढता ताण आणि मानसिक संतुलन राखण्याबाबत ते मार्गदर्शन (Marathi Patrakar Sangh)करतील.
मुख्य समारंभाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचीही उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पुढारी माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव भूषवणार आहेत. तसेच निलेश खरे, सरिता कौशिक, कमलेश सुतार आणि मंदार फणसे यांसारखे प्रमुख संपादक उपस्थित राहणार (Marathi Patrakar Sangh)आहेत.
अधिवेशनादरम्यान पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी ‘आदर्श पत्रकारिता पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या नेतृत्वाखाली या महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले असून राज्यभरातील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अधिवेशन यशस्वी करण्याचे आवाहन संघातर्फे करण्यात आले (Marathi Patrakar Sangh) आहे.
