Home गुन्हे Bhosari Crime News:सोन्याचा झुमका चोरीचा खोटा आरोप; ब्लॅकमेलिंगला कंटाळून २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या

Bhosari Crime News:सोन्याचा झुमका चोरीचा खोटा आरोप; ब्लॅकमेलिंगला कंटाळून २६ वर्षीय तरुणाची आत्महत्या

भोसरीत सोन्याचा झुमका चोरी केल्याचा आरोप करून पैशांची मागणी व ब्लॅकमेलिंग केल्याच्या त्रासाला कंटाळून २६ वर्षीय तरुणाने १२ मजली इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना.

by Admin
Spread the love

पिंपरी : सोन्याचा झुमका चोरी केल्याचा आरोप करून पैशांची मागणी तसेच ब्लॅकमेलिंग केल्याच्या त्रासाला कंटाळून एका २६ वर्षीय तरुणाने १२ मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भोसरी परिसरात घडली. या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (Bhosari Crime News)आहे.

या प्रकरणी पेमाराम लसाराम चौधरी (वय ५८, रा. भोसरी) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून सरोज नागनाथ माने या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला (Bhosari Crime News)आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ जुलै २०२६ रोजी डेस्टिनेशन क्षितीज सोसायटी परिसरात आरोपी महिलेने तक्रारदार यांचा मुलगा विनोद चौधरी याच्यावर सोन्याचा झुमका चोरी केल्याचा आरोप केला. तसेच त्याला चोरीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत एक लाख रुपये घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला (Bhosari Crime News)आहे.

यानंतरही आरोपी महिलेने आणखी ५५ हजार रुपयांची मागणी केली. एका व्यक्तीसोबत येऊन विनोद याचा मानसिक छळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या त्रासाला आणि ब्लॅकमेलिंगला कंटाळून विनोद याने १२ मजली इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केल्याचे तक्रारीत म्हटले (Bhosari Crime News)आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस करीत (Bhosari Crime News)आहेत.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00