Home गुन्हे Cyber Crime :भोसरीतील उद्योगाला मोठा दिलासा; सायबर फसवणुकीतील ५६ लाख रुपये १००% परत

Cyber Crime :भोसरीतील उद्योगाला मोठा दिलासा; सायबर फसवणुकीतील ५६ लाख रुपये १००% परत

भोसरीतील PHBB Valves कंपनीची ईमेल स्पूफिंगद्वारे ५६ लाखांची आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक झाली होती. पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी तत्पर कारवाई करत संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सायबर पोलीस ठाण्याने आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक प्रकरणात उल्लेखनीय यश मिळवत भोसरीतील उद्योगपतीला मोठा दिलासा दिला आहे. परदेशातील बँक खात्यात वळवण्यात आलेली तब्बल ५६ लाख रुपयांची रक्कम सायबर पोलिसांनी शंभर टक्के परत मिळवून (Cyber Crime) दिली.

 

भोसरी येथील ‘PHBB Valves Pvt. Ltd.’ या कंपनीचे संचालक संजय जाधव यांनी सायबर पोर्टलवर याबाबत तक्रार नोंदवली होती. त्यांच्या कंपनीचे चीनमधील एका कंपनीशी नियमित व्यावसायिक व्यवहार सुरू होते. दरम्यान, अज्ञात सायबर गुन्हेगारांनी मूळ कंपनीच्या ईमेल आयडीसारखा बनावट ईमेल तयार करून बँक खात्यात बदल झाल्याचे भासवले. त्या माध्यमातून अमेरिकेतील ‘Citizen Bank’ येथील खात्यावर ५६ लाख रुपये पाठवण्यास सांगण्यात (Cyber Crime)आले.

 

ईमेल विश्वासार्ह वाटल्याने जाधव यांनी ६ एप्रिल २०२६ रोजी संबंधित रक्कम ट्रान्सफर केली. मात्र, नंतर मूळ कंपनीशी संपर्क साधल्यानंतर फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात (Cyber Crime) आला.

 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलने तात्काळ तपास सुरू केला. परदेशातील बँक खाते असल्यामुळे तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी निर्माण झाल्या, तरीही पोलिसांनी संबंधित बँक व नोडल अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधत व्यवहाराची साखळी तपासली. अखेर ही रक्कम गोठवून (फ्रीज) ती पुन्हा तक्रारदाराच्या खात्यात जमा करण्यात पोलिसांना यश (Cyber Crime) आले.

 

ही कारवाई पोलीस निरीक्षक रविकिरण नाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रविण स्वामी, उपनिरीक्षक वैभव पाटील, पोलीस कर्मचारी प्रकाश कातकाडे आणि त्यांच्या पथकाने पार (Cyber Crime) पाडली.

 

सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांची ही कारवाई नागरिकांसाठी दिलासादायक ठरत (Cyber Crime) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00