Home माझं पिंपरी चिंचवड PCMC BJP protest:पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर भाजपच्या आंदोलनात घोषणाबाजीचा गोंधळ; स्वतःच्याच सरकारविरोधात नारेबाजी!

PCMC BJP protest:पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर भाजपच्या आंदोलनात घोषणाबाजीचा गोंधळ; स्वतःच्याच सरकारविरोधात नारेबाजी!

पिंपरी-चिंचवड महापालिकेसमोर भाजपच्या आंदोलनात घोषणाबाजीचा गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांकडून स्वतःच्याच सरकारविरोधात नारेबाजी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड (दि. २० एप्रिल २०२६) : महिला आरक्षण विधेयकाच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड महापालिका प्रवेशद्वारासमोर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनादरम्यान अनपेक्षितपणे स्वतःच्याच सरकारविरोधात घोषणाबाजी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले (PCMC BJP protest)आहे.

 

या आंदोलनात आमदार उमा खापरे, महापौर रवी लांडगे, पक्षनेते प्रशांत शितोळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. घोषणाबाजी सुरू करताना प्रशांत शितोळे यांनी “या सरकारचे करायचं काय?” अशी घोषणा दिली. त्यावर उपस्थित कार्यकर्त्यांनी “खाली डोकं वर पाय” असा जोरदार प्रतिसाद (PCMC BJP protest) दिला.

 

घोषणेतील संदर्भ लक्षात आल्यानंतर शितोळे यांनी तत्काळ “एनडीए सरकारचं करायचं काय?” अशी सुधारित घोषणा दिली. मात्र कार्यकर्त्यांनी पुन्हा त्याच शब्दांत प्रतिसाद दिल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण ( PCMC BJP protest) झाले.

 

परिस्थिती सावरण्यासाठी आमदार उमा खापरे यांनी हस्तक्षेप करत “एनडीए आघाडीचा विजय असो” अशी घोषणा दिली. त्यानंतर वातावरण( PCMC BJP protest) निवळले.

 

दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटत ( PCMC BJP protest) आहेत.

 

व्हीडिओ सौजन्य

दैनिक सकाळ

आणि

पिंपरी चिंचवड पत्रकार संघ 🙏🙏🙏


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00