Home गुन्हे Pune-93Lakh Fraud:निलंबित पोलीस उपनिरीक्षकासह तिघांकडून ९३ लाखांचा फसवणुकीचा पर्दाफाश

Pune-93Lakh Fraud:निलंबित पोलीस उपनिरीक्षकासह तिघांकडून ९३ लाखांचा फसवणुकीचा पर्दाफाश

भोसरी पोलीस ठाण्यात निलंबित पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी आणि दोन साथीदारांवर ९३ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल. गुंतवणुकीवर दुप्पट परताव्याचे आमिष दाखवून सात नागरिकांची फसवणूक. आरोपी फरार; तपास सुरू.

by Admin
Spread the love

पुणे _भोसरी पोलीस ठाण्यात निलंबित पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी आणि त्यांचे दोन साथीदार यांच्याविरोधात तब्बल ९३ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रहाटणी येथील संतोष तरटे (वय ४३) यांनी १२ नोव्हेंबर २०२५ रोजी दाखल केलेल्या तक्रारीवरून ही (Pune-93Lakh Fraud)कारवाई करण्यात आली.

तक्रारीनुसार, २०२३ मध्ये चिंतामणी यांनी तरटे यांना आकर्षक परताव्याचे गोड बोल घालून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. २० महिन्यांत गुंतवणूक दुप्पट करण्याचे आश्वासन देत तरटे यांच्याकडून १८ लाख रुपये घेतले. मात्र दिलेल्या मुदतीनंतरही केवळ १५ लाख ४० हजार रुपये परत केले गेले असून २० लाख ६० हजार रुपये परत न केल्याने फसवणूक उघड(Pune-93Lakh Fraud) झाली.

पोलीस तपासात आणखी गंभीर बाब समोर आली. चिंतामणी यांनी अशाच पद्धतीने आणखी सहा जणांकडून गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे गोळा केल्याचे स्पष्ट झाले. साक्षीदारांच्या जबाबांतून एकूण ९३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. यात आनंद पिंगळे (४० लाख), बिस्मिल्ला शेख (१० लाख), तसेच शांताराम भोंडवे, गणेश खारगे, शीतल पाटील आणि बापूसाहेब खेंगरे (प्रत्येकी ५ लाख) यांचा समावेश आहे. या सर्वांना कधी ४ टक्के व्याज, तर कधी गुंतवणूक दुप्पट करण्याचे (Pune-93Lakh Fraud)आमिष दाखवले गेले.

या प्रकरणी निलंबित पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी व्यतिरिक्त गोरक्ष मेड (रिक्षाचालक, सांगवी) आणि संदीप अहिर (रिअल इस्टेट एजंट, भोसरी) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१६(२), ३१८(४), ३३६(२), ३३८, ३३६(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तिघेही सध्या फरार असून त्यांच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू(Pune-93Lakh Fraud )आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या मते, फसवणुकीचा बळी ठरलेल्यांची संख्या आणखी वाढू शकते आणि रक्कमही अधिक असल्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास(Pune-93Lakh Fraud) सुरू आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00