Home राजकारण Talawade Election Controversy:तळवडे प्रभाग १२ : राष्ट्रवादीचा खोटा आरोप फोल; मतदार यादीतील त्रुटीवर भाजपची वस्तुस्थिती स्पष्ट

Talawade Election Controversy:तळवडे प्रभाग १२ : राष्ट्रवादीचा खोटा आरोप फोल; मतदार यादीतील त्रुटीवर भाजपची वस्तुस्थिती स्पष्ट

तळवडे प्रभाग क्रमांक १२ मधील मतदार यादीतील तांत्रिक त्रुटीला राजकीय रंग देत राष्ट्रवादीने केलेले आरोप खोटे ठरले. निवडणूक आयोगाच्या चुकांमुळे अनेक मतदारांचे प्रभाग बदलले असून भाजपने तत्परतेने हरकती नोंदवून वस्तुस्थिती स्पष्ट केली.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी:आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तळवडे प्रभाग क्रमांक १२ मध्ये मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पसरवलेला दिशाभूल करणारा कथानक भारतीय जनता पक्षाच्या सतर्क भूमिकेमुळे पूर्णपणे कोसळला आहे. सत्यस्थिती स्पष्ट होताच विरोधकांचा प्रचार कच्च्या धाग्यावर उभा (Talawade Election Controversyअसल्याचे समोर आले.

प्रभाग क्र. १२ मधील यादी भाग क्रमांक ७ हा निवडणूक आयोगाच्या तांत्रिक त्रुटीमुळे चुकीने प्रभाग क्र. १ मध्ये जोडला गेला होता. तळवड्यातील मतदार याद्यांमध्ये झालेल्या या विसंगतीबाबत सर्वात प्रथम आयोगाचे लक्ष वेधणारे प्रतिनिधी म्हणजे माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर. संपूर्ण शहरात मतदार याद्यांमध्ये अव्यवस्था झालेल्या असताना, हा प्रकारदेखील फक्त एक प्रशासकीय दोष असल्याची माहिती उपलब्ध असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी त्याला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न (Talawade Election Controversyकेला.

त्यांनी असा आरोप केला की, “ही चूक आयोगाची नसून भाजपने अधिकाऱ्यांशी संगनमत करून माझे मताधिक्य कमी करण्यासाठी कट रचला आहे.” यादी भाग ७ मध्ये त्यांचे स्वतःचे नाव असल्याने त्यांनी मोठ्या सहानुभूतीची लाट निर्माण करण्यासाठी (Talawade Election Controversy भावनिक सूर लावला.

मात्र वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. भाजपच्या माजी नगरसेविका अरुणाताई भालेकर यांच्या कुटुंबीयांची नावे त्रुटीमुळे प्रभाग ११ मध्ये गेली आहेत. तसेच शांताराम भालेकर यांच्या स्वतःच्या परिवारातील नावे यादी भाग क्रमांक ७ मध्येच आढळून आली आहेत. त्याचप्रमाणे भाजपच्या कोषाध्यक्षा आणि इच्छुक उमेदवार अस्मिता भालेकर यांच्या पती अनिल भालेकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची नावेही याच चुकिच्या यादीत आहेत. त्यामुळे भाजपवर केलेले सर्व आरोप निराधार आणि वास्तवाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट (Talawade Election Controversy झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने केवळ त्यांच्या राजकीय सोयीचा मुद्दा म्हणून यादी भाग क्रमांक ७ (१२६१ मते) प्रकाशात आणला. परंतु खरी परिस्थिती अशी की त्रिवेणीनगरमधील यादी क्रमांक ११४, ११६, ११७, ११८ यांसह एकूण २२०० पेक्षा अधिक मतदार प्रशासकीय अव्यवस्थेमुळे प्रभाग ११ मध्ये टाकले गेले (Talawade Election Controversy आहेत.

या घोळानंतर भाजपने मतदारांना भ्रमित न करता जबाबदारीने कार्य केले. घराघरात जाऊन नागरिकांना योग्य माहिती देणे आणि हरकती नोंदवून घेण्याचा उपक्रम माजी नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली (Talawade Election Controversy राबवण्यात आला.

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि निष्पक्षता राखण्यासाठी भाजप नेहमीच सक्रिय राहील, असा ठाम संदेश प्रभाग क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील यांना निवेदनाद्वारे देत पक्षाने आपली बांधिलकी स्पष्ट केली (Talawade Election Controversy)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00