Home प्रेरणा / यशकथा Rotary Club of Chinchwad:रोटरी क्लब ऑफ चिंचवडतर्फे दिनदर्शिका प्रकाशन व जीवनगौरव पुरस्काराने गौरव

Rotary Club of Chinchwad:रोटरी क्लब ऑफ चिंचवडतर्फे दिनदर्शिका प्रकाशन व जीवनगौरव पुरस्काराने गौरव

अवयवदान जनजागृतीचे आधारस्तंभ आपटेकाका

by Admin
Spread the love

पिंपरी–चिंचवड, प्रतिनिधी :समाजात अवयवदान व देहदानाबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या V4 ऑर्गन्स फाउंडेशनचे संस्थापक श्री. श्रीकांत मुरलीधर आपटे (आपटेकाका) यांचा रोटरी क्लब ऑफ चिंचवड यांच्या वतीने भव्य कार्यक्रमात जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. रोटरी क्लब चिंचवडचे अध्यक्ष श्री. पराग जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याच कार्यक्रमात अवयवदानाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या विशेष दिनदर्शिकेचे प्रकाशनही करण्यात (Rotary Club of Chinchwad)आले.

रोटरी क्लब ऑफ चिंचवड यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम २७ डिसेंबर २०२६ रोजी पिंपरी येथील हॉटेल गणेश येथे मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रोटरी क्लबचे अध्यक्ष पराग जोशी, प्रोजेक्ट डायरेक्टर राजेश अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित(Rotary Club of Chinchwad) होते.

रोटरी क्लब ऑफ चिंचवडने नागरिकांसाठी अवयवदान व सहाय्याचा विशेष उपक्रम राबवून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श ठेवला. यावेळी सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. या दिनदर्शिकेमधून अवयवदानाचे सामाजिक, मानवी व वैद्यकीय महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले असून जनजागृतीचा संदेश सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न रोटरी क्लबने केला(Rotary Club of Chinchwad) आहे.

याच कार्यक्रमात श्रीकांत मुरलीधर आपटे यांच्या दीर्घकालीन, निस्वार्थ व अखंड समाजसेवेची दखल घेत त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अवयवदान जनजागृती चळवळीत त्यांचे योगदान अतुलनीय असून त्यांच्या कार्यामुळे हजारो कुटुंबांना नवे जीवन मिळाल्याचे गौरवोद्गार यावेळी वक्त्यांनी(Rotary Club of Chinchwad) काढले.

आपटे हे विज्ञान व कायदा या दोन्ही शाखांचे पदवीधर असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बँकर्सचे प्रमाणित सहयोगी आहेत. अवयव प्रत्यारोपण समन्वयक म्हणून विशेष प्रशिक्षण घेतलेल्या आपटेकाकांना अवयवदान व प्रत्यारोपणाशी संबंधित कायदेशीर बाबी तसेच कुटुंब समुपदेशनात विशेष कौशल्य आहे. मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून काम केल्यानंतर आणि बँक ऑफ महाराष्ट्रमधून वरिष्ठ व्यवस्थापक पदावरून २०११ मध्ये निवृत्त झाल्यावर त्यांनी पूर्णवेळ समाजसेवेला वाहून(Rotary Club of Chinchwad) घेतले.

सध्या पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात शोक समुपदेशन केंद्राचे प्रमुख म्हणून ते कार्यरत असून मृत दात्यांच्या कुटुंबीयांना समुपदेशन करून अवयवदानासाठी प्रेरित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य ते करत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत १५० हून अधिक जनजागृती कार्यक्रम, ६२ देहदान, ६८ नेत्रदान व २५ त्वचादानांचे यशस्वी समन्वय साधण्यात आले आहेत. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सहकार्याने २१ हजारांहून अधिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण देऊन त्यांनी तरुण पिढीत अवयवदानाची जाणीव निर्माण केली( Rotary Club of Chinchwad)आहे.

रोटरी क्लब ऑफ चिंचवडच्या वतीने अवयवदानाचे महत्व विषद करणाऱ्या 10000 दिनदर्शीकेचे प्रकाशन केले गेले असून ते मोफत वितरीत केले जाणार आहे.

या यशस्वी कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे राजेंद्र पोफळे, किरण राका, यतीश भट, महावीर सत्याना, सचिन वाडबुगर यांच्यासह राजेश अग्रवाल, सर्व पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. अवयवदानाचे महत्त्व सांगणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आणि जीवनगौरव पुरस्काराच्या माध्यमातून रोटरी क्लब ऑफ चिंचवडने अवयवदान व दिव्यांग पुनर्वसन चळवळीला नवे बळ दिल्याचे या कार्यक्रमातून स्पष्टपणे दिसून (Rotary Club of Chinchwad)आले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00