Home माझं पिंपरी चिंचवड PCMC Ncp Alliance:ब्रेकिंग न्यूज | निगडीत राजकीय भूकंप : उपमुख्यमंत्री अजित पवार थेट आजमभाई पानसरे यांच्या बंगल्यावर, शहराच्या राजकारणात खळबळ

PCMC Ncp Alliance:ब्रेकिंग न्यूज | निगडीत राजकीय भूकंप : उपमुख्यमंत्री अजित पवार थेट आजमभाई पानसरे यांच्या बंगल्यावर, शहराच्या राजकारणात खळबळ

निगडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते आजमभाई पानसरे यांच्या निवासस्थानी अचानक भेट दिल्याने शहराच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. निहाल पानसरे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर या भेटीला मोठे राजकीय महत्त्व.

by Admin
Spread the love

निगडी : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आज मोठी आणि अनपेक्षित घडामोड पाहायला मिळाली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे प्रमुख अजितदादा पवार यांनी थेट ज्येष्ठ नेते आजमभाई पानसरे यांच्या निगडी येथील निवासस्थानी भेट दिली. या अचानक झालेल्या भेटीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून विविध तर्कवितर्कांना उधाण आले (PCMC Ncp Alliance) आहे.

विशेष म्हणजे कालच आजमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल पानसरे यांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी गटात अधिकृत प्रवेश केला होता. त्यानंतर अवघ्या एका दिवसात अजितदादांनी स्वतः निगडी येथे येऊन पानसरे कुटुंबाची भेट घेतल्याने या घडामोडीला अधिकच राजकीय वजन प्राप्त झाले (PCMC Ncp Alliance) आहे.

आजमभाई पानसरे हे गेल्या काही काळापासून प्रकृती अस्वस्थतेमुळे सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर होते. त्यामुळे ते सध्या कोणत्या भूमिकेत आहेत, याबाबत संभ्रम होता. मात्र काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या एका कार्यक्रमात आजमभाई पानसरे यांनी उपस्थिती लावल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले होते. त्या कार्यक्रमानंतर ‘आजमभाई पुन्हा सक्रिय होणार’ अशा चर्चांना वेग आला (PCMC Ncp Alliance) होता.

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आजम पानसरे यांचा एकेकाळी मोठा दबदबा राहिला आहे. आजही शहरात त्यांना मानणारा, त्यांच्यावर निष्ठा ठेवणारा मोठा वर्ग सक्रिय आहे. विशेष म्हणजे, आजमभाई यांचा राजकीय कल हा नेहमीच ‘मोठे साहेब’ म्हणजेच शरद पवार यांच्याकडे अधिक झुकलेला असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अजितदादा पवार यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या घरी जाऊन भेट देणे, ही घटना राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली(PCMC Ncp Alliance) जात आहे.

या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट केवळ सौजन्याची नसून राजकीय संकेत देणारी असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. आजमभाई पानसरे पुन्हा सक्रिय होणार का? ते कोणत्या गटाला पाठिंबा देणार? आणि निहाल पानसरे यांच्या प्रवेशानंतर पानसरे कुटुंबाची पुढील राजकीय दिशा काय असेल? अशा अनेक प्रश्नांनी शहराचे राजकारण तापले (PCMC Ncp Alliance)आहे.

एकंदर पाहता, अजितदादा पवारांची ही ‘घरपोच भेट’ ही पिंपरी-चिंचवडच्या राजकीय समीकरणांना नवी कलाटणी देणारी ठरू शकते, असे चित्र सध्या स्पष्ट होत आहे. या घडामोडींचे पडसाद येत्या काही दिवसांत शहराच्या राजकारणात ठळकपणे उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात (PCMC Ncp Alliance)आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00