Home माझं पिंपरी चिंचवड Pradhikaran Senier Citizens :प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर जोशी बिनविरोध; नवी कार्यकारिणी जाहीर

Pradhikaran Senier Citizens :प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर जोशी बिनविरोध; नवी कार्यकारिणी जाहीर

प्राधिकरण, निगडी येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर वासुदेव जोशी यांची 2026-27 साठी बिनविरोध निवड. नव्या कार्यकारिणीची घोषणा; सामाजिक, सांस्कृतिक कार्याला नवे बळ.

by Admin
Spread the love

प्राधिकरण, निगडी – प्राधिकरण परिसरात गेली ३५ वर्षे कार्यरत असलेल्या प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी श्री. चंद्रशेखर वासुदेव जोशी यांची २०२६-२०२७ या वर्षासाठी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांनी नुकताच अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला असून नव्या कार्यकारिणीची घोषणा केली (Pradhikaran Senier Citizens) आहे.

 

संघाच्या उपाध्यक्षपदी दिलीप गोसावी, कार्याध्यक्षा अलका बेल्हेकर, सहकार्याध्यक्षा शुभदा मेंगळे, सहकार्याध्यक्ष दिनेश जैन, कोषाध्यक्ष विलास बेल्हेकर, सहकोषाध्यक्ष श्रीनिवास ठोंबरे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच संपादक आशा नष्टे, सहसंपादक विश्वास म्हशेटे, सर्व समिती प्रमुख रजनी जैन, कार्यक्रम व्यवस्थापन प्रमुख सुनील दुर्गे व सहप्रमुख काशिनाथ पाटील, जनसंपर्क अधिकारी मुकुंद जोशी अशी जबाबदारी सोपविण्यात आली (Pradhikaran Senier Citizens)आहे.

 

याशिवाय शिक्षण व सहल प्रमुख कुंदा कोळपकर (सहप्रमुख पौर्णिमा कासार), सांस्कृतिक प्रमुख ज्योती कानेटकर (सहप्रमुख माधुरी ओक), पत्र लेखन प्रमुख वसंत पाटील (सहप्रमुख वृषाली गुर्जर), सार्वजनिक समस्या निवारण समिती प्रमुख आर. एस. कुमार, शिस्तपालन समिती प्रमुख श्रीकांत पुंडलिक तसेच पर्यावरण समिती सहप्रमुख अस्मिता तारकुंडे यांचीही निवड करण्यात आली(Pradhikaran Senier Citizens) आहे.

 

शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि पर्यावरण क्षेत्रात संघाने आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली असून नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून ही परंपरा अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत(Pradhikaran Senier Citizens) आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00