Home तंत्रज्ञान Nigdi Mukai Kivle Brt:निगडी ते मुकाई चौक-किवळे बीआरटी मार्गावर बससेवा सुरू

Nigdi Mukai Kivle Brt:निगडी ते मुकाई चौक-किवळे बीआरटी मार्गावर बससेवा सुरू

निगडी ते मुकाई चौक-किवळे बीआरटी कॉरिडॉरवर बससेवा सुरू, प्रवास जलद, सुरक्षित आणि सुलभ; 16 बसेस, मल्टिमोडल हबच्या दिशेने पुढाकार.

by Admin
Spread the love

प्रतिनिधी :पिंपरी-निगडी-मुकाई चौक, किवळे परिसर ते वाघोली दरम्यान सुमारे 32 किलोमीटरच्या ‘फास्ट ट्रॅक कॉरिडॉर’ विकसित करण्याचे नियोजन सुरू आहे. या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमपीएमएल यांच्या माध्यमातून निगडी ते मुकाई चौक-किवळे बीआरटी कॉरिडॉरवर बससेवा  (Nigdi Mukai Kivle Brt) सुरू करण्यात आली आहे आमदार शंकर जगताप यांच्या प्रयत्नाने ही सेवा सुरु झाली आहे.

निगडी भक्तीशक्ती चौकापासून ट्रान्सपोर्ट नगर मार्गे मुकाई चौकपर्यंतच्या या नव्या मार्गामुळे नागरिकांना जलद, सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. आगामी काळात हा परिसर “मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब” म्हणून विकसित करणार असल्याचा विश्वासही त्यांनी (Nigdi Mukai Kivle Brt) व्यक्त केला.

पिंपरी-चिंचवड परिसर प्रचंड वेगाने वाढत असल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आमदार शंकर जगताप सतत प्रयत्न करत आहेत. वेळोवेळी प्रशासनाला सूचना देऊन अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. वाघोली, औंध, हिंजवडी या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आयटी उद्योग असल्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा सक्षम करण्याचे नियोजन सुरू (Nigdi Mukai Kivle Brt) आहे.

या नव्या बीआरटी मार्गावरून विविध बस सेवा चालवल्या जातील:

  • निगडी ते आकुर्डी स्टेशन (303)

  • निगडी ते गहुंजे (303A)

  • निगडी ते पिंपरी गुरव (319)

  • निगडी ते हिंजवडी फेज 3 (375)

  • निगडी ते मुकाई चौक (365)

  • भोसरी ते मुकाई चौक (367)

मुकाई चौक ते भक्तीशक्ती बीआरटी रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याने किवळे ते लोहगाव विमानतळ, किवळे ते स्वारगेट, किवळे ते आळंदी, किवळे ते चाकण एमआयडीसी, देहूरोड ते पिंपरीगाव, तसेच सकाळ-सायंकाळ किवळे ते हिंजवडी फेज-3 मार्गावर जास्तीत जास्त बसेस चालवण्याचे निर्देश पीएमपीएमएल  (Nigdi Mukai Kivle Brt)प्रशासनाला देण्यात आले आहेत.

मुकाई चौक-किवळे हा मुंबई-बंगळुरू बायपासवरील पिंपरी-चिंचवड शहराचा महत्त्वाचा प्रवेशद्वार मानला जातो. मुंबईहून येणाऱ्या एसटी तसेच खाजगी प्रवासी वाहनांचा येथे नियमित थांबा असतो. त्यामुळे शहराच्या अंतर्गत भागात जाणाऱ्या प्रवाशांना या नव्या बससेवेचा मोठा लाभ होणार आहे. इस्कॉन रावेत, निगडी, आकुर्डी, भोसरी आदी परिसरातील नागरिकांना आता अधिक सुलभ प्रवास सुविधा उपलब्ध होणार (Nigdi Mukai Kivle Brt) आहेत.

निगडी ते मुकाई चौक-किवळे बीआरटी मार्गावर समर्पित बस लेन असल्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास सुरळीत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सुरुवातीला या मार्गावर 16 बसेस चालवल्या जातील, आणि प्रवासीसंख्या वाढल्यास फेऱ्यांची संख्या वाढवण्याची तयारी पीएमपीएमएलने दर्शवली आहे. प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत की, बीआरटी लेनमध्ये खाजगी गाड्यांची घुसखोरी होऊ नये, तसेच प्रवाशांसाठी सुरक्षित आणि वेगवान सेवा सुनिश्चित केली (Nigdi Mukai Kivle Brt) जावी.

भविष्यात मुकाई चौक-किवळे परिसर मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब म्हणून विकसित होणार आहे, तसेच मुकाई चौक ते वाघोली दरम्यान सुमारे 32 किलोमीटरचा “फास्ट ट्रॅक कॉरिडॉर” तयार करण्याचे नियोजन सुरू आहे.

– शंकर जगताप, आमदार, भाजपा पिंपरी-चिंचवड (Nigdi Mukai Kivle Brt) शहर


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00