Home आरोग्य Blood Donation :स्नेहसावली वृध्दाश्रमात १३ फेब्रुवारीला रक्तदान महाकुंभ

Blood Donation :स्नेहसावली वृध्दाश्रमात १३ फेब्रुवारीला रक्तदान महाकुंभ

चिंचवड व चर्होली येथील स्नेहसावली नि:शुल्क वृध्दाश्रमात १३ फेब्रुवारी रोजी रक्तदान महाकुंभ; ७१० रक्तपिशव्यांचे उद्दिष्ट.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड :- चिंचवड व चर्होली येथील स्नेहसावली आपलं घर या पूर्णपणे नि:शुल्क वृध्दाश्रमाच्या वतीने स्क्रॅप बॅंक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य रक्तदान महाकुंभ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत ७१० रक्तपिशव्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले(Blood Donation) आहे.

या रक्तदान शिबिरात नागरिकांनी प्रत्यक्ष रक्तदानासाठी सहभागी व्हावे, रक्तदान शक्य नसेल तर स्वयंसेवक म्हणून मदत करावी, अथवा उपस्थित राहून उपक्रमाला शुभेच्छा व प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. समाजोपयोगी आणि सेवाभावी भावनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे आयोजकांनी (Blood Donation)सांगितले.

या रक्तदान महाकुंभाचे आयोजन स्नेहसावली आपलं घरच्या वतीने करण्यात आले असून, अधिक माहितीसाठी डॉ. अविनाश शैलजा शांताराम वैद्य (९५७९२ २५२९८) व श्रीनिवास मोहनप्यारी मोहनलाल राठी (९८२२१ १७८८२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले (Blood Donation) आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00