Home गुन्हे BJP leader controversy:सत्ता येताच सुरु मुजोरी,महापालिकेत ठेक्यासाठी दडपशाहीचा आरोप; भाजप पदाधिकाऱ्यावर महिला उपायुक्तांची तक्रार

BJP leader controversy:सत्ता येताच सुरु मुजोरी,महापालिकेत ठेक्यासाठी दडपशाहीचा आरोप; भाजप पदाधिकाऱ्यावर महिला उपायुक्तांची तक्रार

पिंपरी-चिंचवड महापालिकेत ठेका मिळवण्यासाठी महिला उपायुक्तांवर दबाव टाकल्याचा आरोप. भाजप शहर उपाध्यक्षावर अदखलपात्र गुन्हा दाखल.

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड महापालिकेत सलग दुसऱ्यांदा बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपचा महापौर पदभार स्वीकारत असतानाच, शहर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने ठेका मिळवण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यावर दडपशाही केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका महिला उपायुक्तांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली असून, यामुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली (BJP leader controversy) आहे.

शुक्रवारी (दि. ६) दुपारी साडेबाराच्या सुमारास महापालिकेच्या कार्यालयात ही घटना घडली. महापालिकेतील एका विभागाशी संबंधित कंत्राट भाजपचे शहर उपाध्यक्ष पोपट हजारे यांच्या ‘सन राईज फाऊंडेशन’ या संस्थेला मिळावे, यासाठी त्यांनी संबंधित महिला उपायुक्तांच्या केबिनमध्ये प्रवेश करून नियम व अटी बदलण्याची मागणी केल्याचा आरोप (BJP leader controversy) आहे.

तक्रारीनुसार, उपायुक्तांनी कंत्राटाबाबतची प्रक्रिया समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता, संबंधित पदाधिकाऱ्याने त्यांचे न ऐकता मोठ्या आवाजात बोलत दबाव टाकला. “मी सांगतो त्याप्रमाणे नियम बदला, अन्यथा परिणाम भोगावे लागतील,” अशी धमकी देत कर्मचाऱ्यांसमोर शिवीगाळ केल्याचा आरोपही तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या महिला उपायुक्तांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत लेखी तक्रार दाखल (BJP leader controversy)केली.

या तक्रारीच्या आधारे शहर भाजप उपाध्यक्ष पोपट हजारे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, संबंधित पदाधिकाऱ्याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. “मी कोणतीही धमकी दिलेली नाही. माझ्या संस्थेला हे काम मिळावे, यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाकडून पत्र देण्यात आले होते. मात्र, महापालिकेने निविदा प्रक्रिया राबवत छत्रपती संभाजीनगर येथील संस्थेला काम दिले. शहरात कार्यरत असलेल्या संस्थेला डावलण्यात आले,” असा दावा त्यांनी केला (BJP leader controversy)आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे, याच दिवशी महापालिकेत महापौरपदी रवी लांडगे आणि उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली. लोकप्रतिनिधी पदभार स्वीकारत असतानाच, प्रशासनावर दबाव टाकण्याचा आरोप झाल्याने हा प्रकार चर्चेचा विषय ठरला (BJP leader controversy)आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00