Home क्रीडा Mission World Cup:खराब सुरुवात, अमेरिकेचा जोरदार प्रतिकार आणि सूर्यकुमारचे नेतृत्व

Mission World Cup:खराब सुरुवात, अमेरिकेचा जोरदार प्रतिकार आणि सूर्यकुमारचे नेतृत्व

भारताची विश्वचषकात थरारक विजयी सलामी

by Admin
Spread the love

(विवेक कुलकर्णी लिहतात ):टी-20 विश्वचषक 2026 मधील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने अमेरिकेवर विजय मिळवत मोहिमेची विजयी सुरुवात केली असली, तरी हा सामना भारतासाठी सोपा मुळीच नव्हता. खराब सुरुवात, अमेरिकन संघाचा आक्रमक आणि शिस्तबद्ध खेळ, तसेच निर्णायक क्षणी कर्णधार सूर्यकुमार यादव यांचे नेतृत्व – या साऱ्यामुळे हा सामना अत्यंत चुरशीचा (Mission World Cup)  ठरला.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली; मात्र अपेक्षेप्रमाणे सुरुवात झाली नाही. धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा आणि ईशान किशन लवकर तंबूत परतले. पुनरागमन करणाऱ्या तिलक वर्माकडूनही अपेक्षित योगदान मिळाले नाही. अवघ्या काही षटकांत भारतीय फलंदाजी कोलमडल्याने संघावर मोठा दबाव (Mission World Cup) आला.

या टप्प्यावर अमेरिकन गोलंदाजांनी उत्कृष्ट शिस्त दाखवत भारतीय फलंदाजांना चांगलाच घाम फोडला. योग्य लाईन-लेंग्थ, वेगातील बदल आणि क्षेत्ररक्षणातील चपळता यामुळे USA संघाने भारताला सहजपणे हाताळले आणि सामना आपल्या बाजूने वळवण्याच्या जवळ नेला. काही क्षणांसाठी अमेरिकन संघ पुन्हा एकदा विश्वचषकात खळबळ उडवेल, असे चित्र स्पष्ट दिसू (Mission World Cup)  लागले.

मात्र, संकटात सापडलेल्या भारतीय संघासाठी कर्णधार सूर्यकुमार यादव हा आधार ठरला. ‘Mr. 360’ म्हणून ओळख असलेल्या सूर्यकुमारने परिस्थितीची अचूक जाणीव ठेवत संयमी, पण गरजेनुसार आक्रमक खेळी साकारली. त्याने नाबाद अर्धशतक झळकावत भारताला सन्मानजनक आणि लढण्याजोग्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. ही खेळी केवळ धावांची नव्हे, तर नेतृत्वाची आणि आत्मविश्वासाचीही (Mission World Cup)  होती.

सूर्यकुमारच्या खेळीमुळे भारताने काहीसे वरचढ स्थान मिळवले असले, तरी सामना अजूनही पूर्णपणे खुला होता. धावांचा पाठलाग करताना अमेरिकन फलंदाजांनी कोणतीही घाई न करता निर्धाराने खेळ केला. भारतीय गोलंदाजांना सुरुवातीच्या षटकांत सहज विकेट्स मिळाल्या नाहीत, आणि USA संघाने सामना रंगतदार ठेवत भारतावर सातत्याने दबाव निर्माण (Mission World Cup)  केला.

अशा वेळी कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव यांनी अचूक निर्णय घेत गोलंदाजांचा योग्य वापर केला. गोलंदाजीतील बदल, क्षेत्ररक्षणाची मांडणी आणि निर्णायक क्षणी अनुभवी गोलंदाजांवर दाखवलेला विश्वास यामुळे भारताला सामन्यावर नियंत्रण मिळवता आले. अखेर शिस्तबद्ध गोलंदाजीच्या जोरावर अमेरिकेचा डाव रोखण्यात भारत यशस्वी (Mission World Cup)  ठरला.

या विजयासह भारताने टी-20 विश्वचषकातील सलग नववा विजय नोंदवला, तर कर्णधार सूर्यकुमार यादव यांना त्यांच्या नाबाद अर्धशतकी खेळी आणि उत्कृष्ट नेतृत्वासाठी सामन्याचा मानकरी म्हणून गौरवण्यात (Mission World Cup)  आले.

पराभव पत्करावा लागला असला, तरी अमेरिकन संघाने दाखवलेला आत्मविश्वास, शिस्त आणि लढाऊ वृत्ती नक्कीच दखल घेण्यासारखी ठरली. त्यांनी भारतासारख्या बलाढ्य संघाला अखेरपर्यंत झुंज दिली आणि पुढील सामन्यांसाठी आपली ताकद अधोरेखित (Mission World Cup)  केली.

खराब सुरुवातीनंतर सावरत मिळवलेला हा विजय भारतीय संघाच्या मानसिक मजबुतीचा आणि नेतृत्वक्षमतेचा प्रत्यय देणारा ठरला (Mission World Cup)  आहे.

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00