पिंपरी-चिंचवड : जन्मतः कर्णबधिर असलेल्या दोन लहान मुलींना ऐकण्याची आणि बोलण्याची नवी संधी देत चिंचवडमधील मोरया रुग्णालयाने वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. अक्षय वाचासुंदर यांनी इंदू आणि गीत या दोन्ही मुलींवर यशस्वी कॉक्लियर इंप्लान्ट शस्त्रक्रिया करून त्यांना नवजीवन (Morya Hospital Chinchwad) दिले.
देहूरोड परिसरातील मल्लेश कानडे यांच्या या दोन्ही मुली जन्मतः कर्णबधिर असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे कुटुंबावर मोठा मानसिक व आर्थिक ताण निर्माण झाला होता. मात्र वेळेत योग्य निदान आणि तज्ज्ञ उपचार मिळाल्याने या दोन्ही मुलींना आता ऐकण्याची क्षमता प्राप्त झाली (Morya Hospital Chinchwad)आहे.
गीत हिची शस्त्रक्रिया राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम (RBSK) अंतर्गत करण्यात आली, तर इंदूची शस्त्रक्रिया मुख्यमंत्री सहायता निधी आणि मोरया रुग्णालयाच्या मदतीतून पूर्ण झाली. विशेष म्हणजे या दोन्ही शस्त्रक्रियांसाठी पालकांना कोणताही खर्च करावा लागला (Morya Hospital Chinchwad)नाही.
शस्त्रक्रियेनंतर इंदू आणि गीत यांनी प्रथमच आई-वडिलांचा आवाज ऐकला. हा क्षण त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत भावनिक आणि आयुष्यभर लक्षात राहणारा (Morya Hospital Chinchwad)ठरला.
सध्या दोन्ही मुली यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात ‘कोक्लिया पुणे’च्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या स्पीच थेरपी केंद्रात मोफत उपचार घेत आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा पुढील विकासही सुरू (Morya Hospital Chinchwad)आहे.
पत्रकार परिषदेस मोरया रुग्णालयाचे कार्यकारी विश्वस्त डॉ. अविनाश वाचासुंदर, संबंधित डॉक्टर आणि मुलींचे पालक उपस्थित (Morya Hospital Chinchwad)होते.
यावेळी मल्लेश कानडे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “आर्थिक अडचणींमुळे मुलींच्या उपचारांबाबत चिंता होती. मात्र विविध शासकीय योजना आणि रुग्णालयाच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले. आता मुलींना ऐकू येत आहे, हा आमच्यासाठी नवजीवनाचा आनंद (Morya Hospital Chinchwad)आहे.
