प्रतिनिधी:यशवंतराव चव्हाण यांची राजकीय वाटचाल समन्वयवादी होती, त्यामुळे आजच्या पिढीतील नेत्यांनी ‘यशवंतनीती’ आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, चिंचवड येथे गुरुवार, २७ नोव्हेंबर रोजी आयोजित ‘यशवंत – वेणू सन्मान’ प्रदान(Yashwant Venu Award) सोहळ्यात ते बोलत होते.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभागातर्फे लातूरचे माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पाटील कव्हेकर यांना यशवंत – वेणू सन्मान प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर होते. पद्मश्री गिरीश प्रभुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांच्या उपस्थितीने(Yashwant Venu Award) व्यासपीठ उजळून निघाले.
याप्रसंगी रुद्रवीर टेक्नो इंडस्ट्रीजचे संचालक विशाल पलांडे (यशवंतराव चव्हाण युवा उद्योजक पुरस्कार) आणि ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे (यशवंतराव चव्हाण सह्याद्री भला माणूस पुरस्कार) यांनाही गौरविण्यात(Yashwant Venu Award )आले.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “यशवंतराव आणि वेणूताईंचे दाम्पत्यजीवन परस्परांवरील निखळ समर्पणाचे उदाहरण होते. यशवंतरावांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाला वेणूताईंनी शांत, सुगंधी सहचारिणीप्रमाणे साथ दिली. कव्हेकर दांपत्याचे सामाजिक योगदान व्यापक असून त्यांच्या कार्यात यशवंत–वेणू जोडीचे प्रतिबिंब दिसते; त्यामुळेच ते या सन्मानास (Yashwant Venu Award) पात्र आहेत.”
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी, “यशवंतरावांनी विकासाची धार बहुजनांपर्यंत पोहोचवली,” असे मत व्यक्त केले. तर सुनीताराजे पवार म्हणाल्या, “देश कृषिप्रधान असूनही शेतकऱ्यांची स्थिती दयनीय आहे. यशवंतरावांनी सांस्कृतिक जीवनातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. वेणूताई त्यांच्या मागे एक शांत ज्योत(Yashwant Venu Award) बनून उभ्या राहिल्या.”
सन्मान स्वीकारताना शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले, “यशवंतराव हे खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. वेणूताई त्यांच्यासाठी सावलीप्रमाणे कायम साथ करणाऱ्या होत्या. महाराष्ट्र हा फक्त मराठ्यांचा नाही तर संपूर्ण मराठी जनतेचा आहे, ही यशवंतरावांची ठाम भूमिका होती. २०४० पर्यंत भारत महासत्ता बनेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त (Yashwant Venu Award)केला.
प्रतिभा पाटील कव्हेकर म्हणाल्या, “हा गौरव हा आमच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण आहे,” असे सांगून त्यांनी सामाजिक कार्याचा आढावा दिला. विशाल पलांडे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करण्याचा प्रवास सांगितला, तर नंदकुमार मुरडे यांनी कृतज्ञता व्यक्त (Yashwant Venu Award)केली.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षपूजन आणि नितीन देशमुख लिखित ‘यशवंतराव’ कवितेचे राजेंद्र वाघ यांनी केलेल्या गायनाने झाली. प्रास्ताविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. सुदाम भोरे यांनी स्वागत केले. श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘यशवंतराव इतिहासाचे सुवर्णपान’ या विषयावर व्याख्यान दिले. मानपत्राचे वाचन मानसी चिटणीस यांनी केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. पंडित विद्यासागर यांनी, “केंद्र सरकारमध्ये चार महत्त्वाची खाती सांभाळणारे यशवंतराव हे महाराष्ट्रातील एकमेव नेते होते,” असे (Yashwant Venu Award) सांगितले.
कार्यक्रमाच्या संयोजनात अरुण गराडे, इंद्रजित पाटोळे, प्रतिमा काळे, जयवंत भोसले, प्रा. प्रभाकर दाभाडे, राजू जाधव आणि प्रदीप गांधीलीकर यांनी सहकार्य केले. सुत्रसंचालन प्रा. दिगंबर ढोकले यांनी केले, तर आभारप्रदर्शन संगीता झिंजुरके (Yashwant Venu Award)यांनी केले.
