Home आरोग्य Dr Vijay Suryawanshi:पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छता, अतिक्रमण व अनधिकृत नळजोडण्यांवर महापालिकेची कडक कारवाई

Dr Vijay Suryawanshi:पिंपरी-चिंचवडमध्ये स्वच्छता, अतिक्रमण व अनधिकृत नळजोडण्यांवर महापालिकेची कडक कारवाई

अनधिकृत जाहिराती, पाणी चोरी, फुटपाथ अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

by Admin
Spread the love

पिंपरी-चिंचवड : शहरातील स्वच्छता, अतिक्रमण, अनधिकृत नळजोडण्या आणि बेकायदेशीर बांधकामांविरोधात महापालिका प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे. संबंधित विभागांनी तातडीने कारवाई मोहीम राबवावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना (Dr Vijay Suryawanshi) दिले.

 

महापालिकेच्या प्रमुख अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी शहरातील शिस्त आणि स्वच्छता राखण्यासाठी अ‍ॅक्शन मोडमध्ये काम करण्यास सांगितले. भिंती, दूरध्वनी खांब, वीज वितरण यंत्रणांवर लावलेले अनधिकृत बॅनर व जाहिरात फलक तात्काळ हटवून संबंधितांना नोटीस देण्याचे आदेश देण्यात (Dr Vijay Suryawanshi)आले.

 

पादचाऱ्यांसाठी सुरक्षित आणि मोकळे मार्ग उपलब्ध व्हावेत यासाठी “अतिक्रमणमुक्त फुटपाथ” मोहिमेला गती देण्यात येणार आहे. तसेच शहरातील बेकायदेशीर नळजोडण्या शोधून त्यावर थेट कारवाई केली जाणार असून पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासन सज्ज झाले(Dr Vijay Suryawanshi) आहे.

 

परवानगीशिवाय सुरू असलेल्या बांधकामांवरही कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करत आयुक्तांनी नागरिकांना घर किंवा सदनिका खरेदीपूर्वी अधिकृत बांधकाम परवानगीची खात्री करूनच व्यवहार करण्याचे आवाहन(Dr Vijay Suryawanshi) केले.

 

स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६च्या पार्श्वभूमीवर कचरा संकलन, विलगीकरण आणि व्यवस्थापनावरही बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. शहराला देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे, असेही निर्देश देण्यात (Dr Vijay Suryawanshi)आले.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00