Home मनोरंजन Jijau Vyakhyanmala :जिजाऊ व्याख्यानमालेत संतविचारांचा जागर; प्रा. डॉ. संजय चौधरी यांचे मार्गदर्शन

Jijau Vyakhyanmala :जिजाऊ व्याख्यानमालेत संतविचारांचा जागर; प्रा. डॉ. संजय चौधरी यांचे मार्गदर्शन

: पिंपरीतील जिजाऊ व्याख्यानमालेच्या दुसऱ्या पुष्पात प्रा. डॉ. संजय चौधरी यांनी ‘संतांच्या संगती’ या विषयावर व्याख्यान देत संतसाहित्य, समाजप्रबोधन आणि मानवतेचा संदेश मांडला.

by Admin
Spread the love

पिंपरी : गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प उत्साहात संपन्न झाले. ‘संतांच्या संगती’ या विषयावर प्रा. डॉ. संजय चौधरी यांनी मार्गदर्शन करताना, “संतांच्या सहवासातून समाजाला सद्विचारांचा लाभ होतो,” असे प्रतिपादन (Jijau Vyakhyanmala) केले.

 

चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वारकरी महासंघाचे अध्यक्ष विजय जगताप होते. तसेच नगरसेवक सुरेश भोईर, ह.भ.प. किसनमहाराज चौधरी आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती (Jijau Vyakhyanmala)होती.

 

प्रा. डॉ. चौधरी यांनी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, बहिणाबाई आदी संतांच्या विचारांचा संदर्भ देत समाजप्रबोधन, अंधश्रद्धा निर्मूलन आणि मानवतेचा संदेश यावर भाष्य केले. संतसाहित्य हे कर्मकांडरहित असून माणसाने मनुष्यत्वाकडे वाटचाल करावी, हीच संतांची शिकवण असल्याचे त्यांनी (Jijau Vyakhyanmala) सांगितले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाभाऊ गोलांडे यांनी केले. अमित चौधरी यांनी सूत्रसंचालन, तर सुहास पोफळे यांनी आभार प्रदर्शन केले. संयोजनासाठी विविध कार्यकर्त्यांनी सहकार्य (Jijau Vyakhyanmala) केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00